शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यावर छापे

By admin | Updated: May 1, 2015 00:14 IST

बेहिशेबी मालमत्तेची चौकशी : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुरात सीबीआयची कारवाई; दोन तास झाडाझडती

कोल्हापूर /रत्नागिरी/सिंधुदुर्ग : शहरातील ताराबाई पार्क येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या कोल्हापूर कार्यालयातील सहायक महाव्यवस्थापक प्रभाकर पाटील याच्या येथील कार्यालय, निवासस्थान आणि रत्नागिरीतील निवासस्थानावर केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय)पथकाने छापे टाकून त्याची कसून चौकशी केली आहे. सिंधुदुर्गातील त्याच्या मालमत्तेची चौकशीही या पथकाने केली आहे. या चौकशीत पाटील याचे रत्नागिरीत आठ फ्लॅट आणि एका व्यापारी गाळ्यासह ४३ लाखांची स्थावर मालमत्ता, तसेच १ लाख २० हजाराची रोकड, ५३ लाखांची ठेव प्रमाणपत्रे आणि विविध कंपन्यांचे शेअर्स आढळून आले आहेत. त्याची बॅँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सीबीआयने सुरू केली आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.प्रभाकर पाटील हा भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) रत्नागिरी येथे सहायक महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याची तडकाफडकी बदली कोल्हापूर कार्यालयाकडे करण्यात आली. यावेळी मुंबई येथील कार्यालयाकडून त्याच्यावर कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवू नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे त्याच्याकडे कोणतेही अधिकार न ठेवता कार्यालयीन कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली होती. मंगळवारी अकराच्या सुमारास कोल्हापुरातील कार्यालयात पाटील हा हजर असताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने महाव्यवस्थापक एम. आर. रावत यांची भेट घेतली. त्यांनी मुंबईतील सीबीआय न्यायालयाच्या आदेशानुसार सहायक महाव्यवस्थापक पाटील याच्या कक्षाची झडती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यांनी त्यासाठी परवानगी देताच पथकाने पाटील याच्या कक्षाची सुमारे दोन तास झडती घेतली. त्यानंतर पथकाने पाटील राहत असलेल्या न्यू शाहूपुरी येथील संचार कॉलनीमधील घराचीही झडती घेतली. या छाप्यांमधून पाटील याने रत्नागिरीतही प्रचंड माया जमवली असल्याचे पुढे आल्याने सीबीआयच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस त्याच्या ररत्नागिरीतील मालमत्तावर छापे टाकून झडती घेतली. (प्रतिनिधी)रत्नागिरीतहीजमवली प्रचंड मायाबुधवारी रात्री १0 वाजता सीबीआयचे पोलीस निरीक्षक रमाकांत शारंगधर आणि पोलीस निरीक्षक विलास महाडगुत आपल्या पथकासह रत्नागिरीत दाखल झाले.एस. टी. स्टँडसमोर बेंजामिन एन्क्लेव्हच्या मागील बाजूस स्वप्नलोक अपार्टमेंटमध्ये क्रमांक १0१ ते १0४ आणि २0१ ते २0४ असे आठ फ्लॅट प्रभाकर पाटील याचे आहेत.प्रभाकर पाटील यांची कारकीर्दच वादग्रस्तसावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बीएसएनएलचे तत्कालीन जिल्हा प्रबंधक प्रभाकर पाटील याच्यावर सीबीआयने छापे टाकल्याने त्याचा कोकणपट्ट्यातील २१ वर्षांचा कार्यकाल उजेडात आला आहे. त्याची बहुतांश कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्याच्या कार्यकालातच जिल्ह्यात सीमकार्ड घोटाळा उघड झाला होता.प्रभाकर पाटील प्रथम १९९४ मध्ये रत्नागिरी येथील बीएसएनएल कार्यालयात दाखल झाला. त्यानंतर त्याची पूर्ण कारकीर्द कोकणातच गेली. २००१ मध्ये तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रबंधक असताना त्याचे सहकारी ए. आर. दामले यांच्यावरही सीबीआयने सावंतवाडीत येऊन बेहिशेबी संपत्तीप्रकरणी छापा टाकला होता.त्यानंतर प्रभाकर पाटील याची बदली जम्मू-काश्मीर येथे करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा कोकणात आला. तो २७ मे २०११ पासून सिंधुदुर्गचा जिल्हा प्रबंधक म्हणून कार्यरत होता. त्याची ५ आॅक्टोबर २०१४ रोजी कोल्हापूर येथे उपमहाप्रबंधक या पदावर बदली झाली. तत्पूर्वी, त्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा प्रबंधकपदाचा कार्यभारही सांभाळला होता.या २१ वर्षांच्या काळात त्याने देवगड येथे काही बागायती जमीन खरेदी केल्याची चर्चा होती. पण या बागायतींबाबत त्याला अनेकवेळा विचारले असता, ती बागायती आपली नसून नातेवाइकांची असल्याचे उत्तर तो सर्वांना देत असे.सीबीआयने बुधवारी त्याच्या कोल्हापूर व रत्नागिरी येथील घरांवर छापे टाकल्यानंतर गुरुवारी पहाटे सीबीआयचे पथक सिंधुदुर्गमध्ये आले होते.त्यांनी देवगड येथे जाऊन प्रत्यक्ष जमिनीची तसेच कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर हे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले. या प्रकाराबाबत सिंधुदुर्ग बीएसएनएलचे उपप्रबंधक प्रकाश बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सीबीआयचे पथक सावंतवाडीत आले नाही. मात्र, इतर ठिकाणी चौकशी केली असेल, तर मला माहिती नाहीे. (प्रतिनिधी)तसेच २१५ क्रमांकाचा एक व्यापारी गाळाही आहेत. या सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांनी झडती घेतली. ही मालमत्ता ४३ लाखांची आहे. यातील एका फ्लॅटमध्ये १ लाख २0 हजारांची रोकड आणि ५३ लाखांची मुदत ठेव प्रमाणपत्रे (फिक्स्ड डिपॉझिट सर्टिफिकेटस्) आढळली. ती ताब्यात घेण्यात आली आहेत.विविध कंपन्यांचे शेअर्सही त्याच्याकडे सापडले आहेत. गुरुवारी सकाळच्या सत्रात पाटील याच्यासह या अधिकाऱ्यांनी एका बँकेत जाऊन त्याचे तेथील खाते गोठवण्याबाबतची प्रक्रियाही सुरू केली आहे.जिल्हा व्यवस्थापक ते सहायक महाव्यवस्थापकप्रभाकर पाटील हा रत्नागिरीमध्ये पूर्वी दूरसंचार जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. नंतर सहायक महाव्यवस्थापक म्हणून तो कार्यरत होता. बराच काळ रत्नागिरीमध्ये महाव्यवस्थापक पद रिक्त होते. त्या काळात या पदाचा कार्यभार त्याच्याकडेच होता.त्याच्या काळातच सिंधुदुर्गात सीमकार्ड घोटाळा झाला होता. त्यामुळे मुंबई सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पाटील याची चौकशी सुरू केली होती.तीन दिवस कोल्हापूरमध्ये ही चौकशी सुरू होती. पाटील याला ताब्यात घेऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्याने रत्नागिरीतही मोठी स्थावर मालमत्ता जमवली असल्याची माहिती पुढे आली.प्रभाकर पाटील याची सिंधुदुर्गातही चौकशीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक प्रभाकर पाटील याची देवगड येथेही मोठ्या प्रमाणात जमीन असल्याने सीबीआयने ती कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. सीबीआयचे पथक गुरुवारी पहाटे सिंधुदुर्गला येऊन गेले. मात्र, याला दुजोरा मिळाला नाही.रत्नागिरीत आठ फ्लॅट, एका व्यापारी गाळ्यासह ४३ लाखांची स्थावर मालमत्तासिंधुदुर्गात असतानासीमकार्डचा घोटाळा