मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी ८ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौºयावर येणार आहेत. ८ सप्टेंबर रोजी ते नांदेड येथे काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते परभणी येथे शेतकरी संघर्ष सभेला संबोधित करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.सकाळी ९.३० वाजता राहुल गांधी हे नांदेडमध्ये दाखल होतील. काँग्रेस मेळाव्यानंतर त्यांचा ताफा मोटारीने परभणीकडे रवाना होणार असून वाटेत शेतकºयांनाही ते भेटण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांचा ८ सप्टेंबरला मराठवाडा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 03:56 IST