शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:29 IST

कधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

अकोला : गुजरात निवडणुकीत राहुल गांधींसोबत असलेल्या कुणाचाही काहीच परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जनतेचा कौल मोदींनाच मिळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केला. विविध कार्यक्रमानिमित्त अकोल्यात आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरात निवडणुकीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकला. त्याचवेळी आपणही तेथे प्रचारात उडी घेणार आहोत. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर यांचा प्रभाव मोडीत निघेल, असा दावाही त्यांनी केला.भाजपाचे स्वतंत्र विदर्भ निर्मितीचे धोरण आहे. विदर्भ वेगळा करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवावा, अशी पक्षाची मागणी आहे. विदर्भ वेगळा झाल्यानंतर दलित, बहुजन, अल्पसंख्यांकांची सत्ता येऊ शकते, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावेकधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.मायावतींचे बौद्ध धर्मांतरणाचे नाटकमायावती सातत्याने बौद्ध धर्मात प्रवेश करण्याची भाषा करतात. त्या आंबेडकरवादी असतील तर खरोखरच बौद्ध धर्मात प्रवेश घेतील़रिपाइं ऐक्यात नेतृत्व आणि युतीमुळे फूटरिपाइंच्या ऐक्यात नेतृत्व कुणी करावे, युती किंवा आघाडी कोणत्या पक्षाशी करावी, या मुद्द्यांवरून नेहमीच फूट पडते. आता नेत्यांनी एकत्र यावे, नेतृत्वाचा निर्णय बहुमताने घ्यावा, अ‍ॅड. आंबेडकर यांचे नेतृत्व आधीपासूनच मान्य आहे. कोणताही निर्णय बहुमताने घेऊन अंमलबजावणी व्हावी, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. जनतेने रिपाइं ऐक्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, ऐक्य न करणाºया नेत्याला जिल्हाबंदी करावी, ऐक्यात अ‍ॅड. आंबेडकर यांचाच खोडा असल्याचे त्यांनी नाव न घेता सूचित केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधी