शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 22:52 IST

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ...

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल ३९ लाख मतदार वाढले कसे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. 

राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीची फोटोसह असलेली मतदार यादी द्यावी आपल्याला द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.  त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं होतं.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न उपस्थित केला. पाच महिन्यांमध्ये ४० लाख मतदार कसे वाढले. हे मतदार आले कुठून त्यावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. तोच तोच विनोद सांगितला की पुन्हा कोणाला हसायला येत नाही, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? आजच्या पत्रकार परिषदेत आमचा ईव्हीएमवर आक्षेप नव्हता तर तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवले आहेत त्यावर होता," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"त्यांनी लोकसभा निकालाचा अभ्यास केला असं म्हणतात. कोणत्या मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली, कोणत्या मतदारसंघात आघाडी मिळाली तरी जिंकू शकत नाही याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातले त्यांनी मतदार बरोबर हेरले आणि बाजूच्या मतदार संघात ते नोंदवले आणि त्यांच्या उमेदवाराला मतदान करून घेतलं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी