शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बंदीमुळे रब्बीची पेरणी खोळंबली, दहा दिवसात १६ टक्केच पेरणी

By admin | Updated: November 17, 2016 20:16 IST

ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्यावेळी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांकडे बियाणे, खते व विविध साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्यााने रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे

विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. 17 : ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्यावेळी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांकडे बियाणे, खते व विविध साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्यााने रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे. जिल्ह्यात ७ नोव्हेंबरपर्यंत ४० टक्के पेरण झाली होती. यामध्ये अधिक गती येणे आवश्यक असतानाच ५६ टक्के पेरणी झाली आहे. दहा दिवसांपूर्वी शासनाने ५०० व हजार रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे याचा परिणाम सर्वच स्तरावर पडला आहे. या निर्णयामुळे कृषि क्षेत्रातील बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत. वऱ्हाडात दिवाळीनंतर रब्बी हंगामाला सुरूवात होते. नोव्हेंबर महिन्यात शेतकरी गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका यासह रब्बी पिकांची पेरणी करतात. 

८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी ५०० व हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्या. तर बँकेतून केवळ चार हजार रूपयेच बदलून घेण्याची मुदत दिली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बियाणे, खत खरेदीसाठी तसेच मजूरांना पेरणीचे पैसे देण्यासाठी पैसेच नाहीत. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेईपर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पेरणी झाली होती. त्यानंतर दहा दिवसात पेरणी मोठ्या प्रमाणात वाढणे अपेक्षित होते. मात्र, गत दहा दिवसात केवळ १६ टक्के पेरणी झाली. १६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात  ५६ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३४३९५ हेक्टर आहे तर ७ नोव्हेंबरपर्यंत ४० टक्के म्हणजे ५४८०३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. तर दहा दिवसात यामध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण 75299 हेक्टरवर पेरणी झाली आहे.बाजार समिती बंदचा फटकाशेतकरी खरीप हंगामातील पिकांची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशातून रब्बीची पेरणी करण्याकरिता बियाणे व खत खरेदी करतात. मात्र, यावर्षी गत दहा दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातीलसोयाबिनसह अन्य शेतमालाची विक्री केलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामात पेरणी करण्याकरिता पैसेच नाहीत.गत दहा दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. तसेच बाजारपेठेत पैसेच नाहीत. बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. उधार देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी सध्या स्थगित ठेवली आहे. बँकेतून मुबलक पैसे मिळाल्यावर रब्बीच्या पेरणीला प्रारंभ करू.- प्रदीप पवारशेतकरी, अजिजपूर