शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शहरांमध्ये ‘इंटिग्रेटेड बसपोर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:48 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल.

नाशिक : प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल. तसेच पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.नाशिकमध्ये मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, बसपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यात येणार आहे. १५ कोटी रुपयांच्या या कामाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यभरात बसपोर्ट उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करून एक एसपीव्ही स्थापन केली जाईल आणि त्यामाध्यमातून बसपोर्ट उभारले जातील. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मुंबई- अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करताना महाराष्टÑात या प्रकल्पाला जागा दिली जाईल, परंतु नाशिकला थांबा द्यावा, ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला अवघ्या सव्वा तासात बुलेट ट्रेनने पोहोचता येईल, असेही ते म्हणाले.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असून, जेएनपीटीचे अंतर कमी होणार आहे. केंद्र सरकार नाशिकला ड्रायपोर्ट साकारणार असल्याने दोन ते अडीच तासांत औद्योगिक व शेतमाल जेएनपीटीपर्यंत निर्यातीसाठी पोहोचू शकेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.गुजरातला मल्टी ट्रान्सपोर्ट रेल्वे स्टेशन सुरू झाले, त्या धर्तीवर देशभरातील शंभर स्टेशनचा खासगीकरणातून पुनर्विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.