शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

आर (उत्तर) - माजी नगरसेवकांना संधीची दारे खुली

By admin | Updated: January 31, 2017 15:30 IST

आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर दहिसरच्या आर (उत्तर) विभागात आता सर्वपक्षीय उमेदवारांनी अभूतपूर्व अशी मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केली

मनोहर कुंभेजकर

मुंबई - आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर दहिसरच्या आर (उत्तर) विभागात आता सर्वपक्षीय उमेदवारांनी अभूतपूर्व अशी मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. या विभागात पूर्वी ७ प्रभाग होते. आता एक प्रभाग वाढल्याने येथील प्रभागसंख्या वाढली आहे. प्रभाग २ आणि ८ हा खुल्या वर्गासाठी तर १, ४, ७ हे प्रभाग महिलांसाठी आणि प्रभाग क्र. ५, ६, १० हे इतर मागासवर्गीय जातीसाठी राखीव झाले आहेत.प्रभाग आरक्षणाचा मोठा फटका हा शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना बसला आहे. आर (मध्य) आणि आर (उत्तर) प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका डॉ. शुभा राऊळ आणि नगरसेवक अभिषेक घोसाळकर या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागाचे विभाजन होऊन नवीन ७ क्रमांकाचा प्रभाग वाढला आहे. पूर्वीचा प्रभाग क्र. २ हा आता खुल्या वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे प्रभाग क्र. १ किंवा आता प्रभाग क्र. ७ हा महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग २ हा प्रामुख्याने गुजराती भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेला विभाग आहे. त्यामुुळे शीतल म्हात्रे यांनी आपल्या पूर्वीच्या प्रभाग क्र. २ मधून निवडणूक लढवावी, असा प्रवाह सध्या दिसून येतो. डॉ. शुभा राऊळ यांचे प्रभाग क्र. ८ मध्ये नाव चर्चेत आहे. तर अभिषेक घोसाळकर यांचे नाव प्रभाग क्र. ८मध्ये तर त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे नाव प्रभाग क्र. ७ साठी चर्चेत आहे. शिवसेनेचे नगरसेवक उदेश पाटेकर यांचा प्रभाग आता महिलांसाठी खुला झाल्यामुळे ते पत्नी सुजाता पाटेकर यांच्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. तर येथून शिवसेना महिला उपविभाग संघटक मीना पानगंद आणि मनसेतून संजना घाडी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख प्रकाश कारकर हे प्रभाग क्र. ६ मध्ये तर शिवसेना उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे हे प्रभाग क्र. २मध्ये इच्छुक असल्याचे समजते. म्हात्रे हे येथील विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष आहेत. आता ते आपल्या जुन्या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते.दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी या सध्या प्रभाग क्र. ९च्या नगरसेविका आहेत. त्यांच्या पूर्वीचा प्रभाग हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे प्रभाग क्र. १० येथून भाजपा नवीन उमेदवाराच्या शोधात असल्याचे समजते. तर येथून शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर आमदार मनीषा चौधरी यांच्या घरातून मुलगा आणि पती यांच्यापैकी कोणाला तरी उमेदवारी मिळेल, अशी विभागात चर्चा आहे. मात्र मनीषा चौधरी यांनी याचा इन्कार केला.मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा या सध्या प्रभाग क्र. ३च्या नगरसेविका आहेत. आता त्या त्यांचा पूर्वीचा प्रभाग क्र. १मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे, तर शिवसेनेच्या गोटातून दीपा पाटील यांचे नाव चर्चेत आहे.अलीकडेच काँग्रेसमधून मुंबई भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेल्या माजी महापौर हरेश्वर पाटील यांच्या स्नुषा योगिता पाटील या भाजपातर्फे प्रभाग क्र. ७ मधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.प्रभाग क्र. ३ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक दिवंगत राजेंद्रकुमार चौबे यांचा मुलगा अभय चौबे यांचे नाव तर शिवसेनेतर्फे येथे उपविभागप्रमुख बाळकृष्ण ब्रीद यांची नावे चर्चेत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अलीकडेच दहिसर स्विमिंग पुलाच्या उद्घाटनामुळे चर्चेत आलेले मनसेचे प्रभाग क्र. ५ चे नगरसेवक प्रकाश दरेकर हे कागदावर जरी मनसेचे नगरसेवक असले तरी तसे मनाने भाजपावासीय झाले आहेत. त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे त्यांचा आता नव्या प्रभागाचा शोध सुरू आहे. प्रभाग क्र. ३ किंवा ११ मधून त्यांचे नाव चर्चेत आहे.