शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:59 IST

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे.

- नारायण जाधवलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सरत्या अर्थात १४ व्या विधानसभेच्या स्थापनेपासून पार पडलेल्या १२ अधिवेशनात राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी ३१,४८४ प्रश्न विचारले असून, यापैकी अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती आहे. यामुळे असे प्रश्न वगळून युनिक प्रश्नांची संख्या ५९२१ असून, त्यात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १०८६ असल्याचे संपर्क संस्थेने आपल्या  विश्लेषण अहवालात म्हटले आहे. 

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे. यात सर्वाधिक २७५ प्रश्न  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी  विचारले असून, त्याखालोखाल कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २६६ प्रश्न विचारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर संजय केळकर २२१ यांचे आहेत. जिल्ह्यात सर्वांत  कमी १२ प्रश्न ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विचारले आहेत.

आमदारनिहाय प्रश्नसंख्याआमदाराचे नाव    प्रश्न महेश चौगुले    ३८प्रमोद पाटील    ८४गणेश नाईक    १२बालाजी किणीकर    १२१शांताराम मोरे    ६२कुमार आयलानी    ११६किसन कथोरे    २७५गणपत गायकवाड    १५२दौलत दरोडा    १५७मंदा म्हात्रे    ७०विश्वनाथ भोईर    ५३गीता जैन    २७संजय केळकर     २२१रईस शेख    १७५जितेंद्र आव्हाड    २६६प्रताप सरनाईक    ९६

मतदारसंघाचा विचार करता ठाणे हा मुंबई, पुण्यानंतरचा सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील १८ पैकी मंदा म्हात्रे आणि गीता जैन या दोन महिला आमदार आहेत. 

विषयनिहाय विचारलेले प्रश्न१४ व्या विधानसभेत महिला व मुलींविषयी ३४, तर आरोग्यावर १००, शालेय शिक्षण ६४, मनुष्यबळ ४८, बालकांवर ४२, आदिवासींविषयी ३८, पर्यावरण ३९, पाणी  ३३,  वीज २०, शेती १०, सिंचनन रोहयो प्रत्येकी ३, पोषण आहारावर दोन प्रश्न विचारले गेले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा