शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: June 12, 2015 00:36 IST

‘लोकमत’चा प्रभाव : विद्यापीठाच्या बैठकीत ८० पैकी गुण देण्याचा निर्णय

संदीप आडनाईक -कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठाने एम. कॉम. (भाग एक)च्या दुसऱ्या सत्रातील ५ मे २0१५ रोजी झालेल्या अ‍ॅडव्हान्स अकौन्टसी विषयातील टॅक्सेसन (पेपर क्रमांक चार) या पेपरला चुकीचा आराखडा दिल्याचे विद्यापीठाने मान्य केले आहे. यासंदर्भात ५ जूनला परीक्षा नियंत्रक कार्यालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना १६ गुणांऐवजी २0 गुणांचे प्रश्न गृहित धरून सोडविलेल्या प्रश्नातील अधिकतम गुणांच्या आणि प्रश्नांची बेरीज करून ८0 पैकी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एम.कॉम.च्या या विषयाच्या विद्यार्थ्यांना चुकीचा आराखडा आल्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७00 विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मे रोजी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या प्रश्नावरील उत्तराचा आग्रह आणि पाठपुरावा परिषदेने केला होता. संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाचच प्रश्न प्रस्ताव नियोजकाने दिल्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक एम. ए. काकडे यांच्या कार्यालयात बैठक बोलाविली होती. यावेळी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. फडतरे, अकौन्टन्सी अँड आॅडिटिंग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. मोहिते, अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रतन कांबळे, अमित वैद्य, प्रा. शंकरराव कुलकर्णी, प्रश्नसंच नियंत्रक डॉ. एम. आर. थिटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.असा झाला निर्णयविद्यापीठाने यासंदर्भात घेतलेल्या अंतिम निर्णयानुसार एम.कॉम. (भाग एक) च्या दुसऱ्या सत्रातील ५ मे २0१५ मध्ये झालेल्या अ‍ॅडव्हान्स अकौन्टसी विषयातील टॅक्सेशन (पेपर क्रमांक चार) प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न १६ गुणांच्या प्रश्नाऐवजी २0 गुणांचे गृहित धरावे व विद्यार्थ्याने सोडविलेल्या एकूण प्रश्नांपैकी ज्या चार प्रश्नांच्या उत्तराला सर्वाधिक गुण प्राप्त होतील, ते गुण देऊन त्यांचा परीक्षेचा निकाल जाहीर करावा, असा निर्णय झाला.