शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनुत्तरितच

By admin | Updated: June 6, 2016 03:34 IST

भूसंपादन, पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे निराकरण करणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अध्यक्षविना तीन वर्षांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागातील

संजय देशपांडे,  औरंगाबादभूसंपादन, पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे निराकरण करणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अध्यक्षविना तीन वर्षांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागातील १३ जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या लहान-मोठ्या तक्रारी घेऊन मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी २००७मध्ये आघाडी सरकारने ‘प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व गाऱ्हाणे निराकरण यंत्रणे’ची स्थापना केली. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी यंत्रणेची कार्यालये थाटण्यात आली. यंत्रणेच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती.मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागासाठी औरंगाबादेतील मानव विकास मिशनच्या जागेत यंत्रणेचे कार्यालय सुरू करण्यात आले. या दोन्ही विभागांतील १३ जिल्ह्यांसाठी यंत्रणेचे अध्यक्षपद राज्याचे तत्कालीन मानव विकास आयुक्त कृष्णा भोगे यांच्याकडे सोपविण्यात आले. भोगे यांनी अध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्तांच्या पाचशेपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढल्या. २००७ ते २०१३ या कालावधीत यंत्रणेचे कामकाज नियमित सुरूहोते. २०१३मध्ये भोगे यांची मानव विकास मिशनच्या आयुक्तपदाची मुदत संपली. त्यांच्या जागी भास्कर मुंढे यांची नियुक्ती झाली. परंतु ‘प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व गाऱ्हाणे निराकरण यंत्रणे’चे अध्यक्षपद मात्र रिक्तच ठेवण्यात आले. अध्यक्षच नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.गाऱ्हाणे निराकरण यंत्रणेच्या कार्यालयाचे आता मार्गदर्शन केंद्रात रूपांतरझाले आहे. एक वरिष्ठ लिपिक आणि एक शिपाई असे दोन कर्मचारी तेथे कार्यरत आहेत. यंत्रणेला कोणी वाली उरलेला नसल्याने हे दोन कर्मचारी कामाशिवाय बसून आहेत. ‘प्रकल्पग्रस्त तक्रारी घेऊन येतात, परंतु अध्यक्ष नसल्याने आम्ही त्या स्वीकारत नाही. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा याचे मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करीत आहोत,’ असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.जायकवाडीसाठीदिली जमीनप्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्षांपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. जायकवाडी प्रकल्पाचे उदाहरण याबाबत बोलके आहे. धरण पूर्ण होऊन ४० वर्षे झाल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम आहेत.सरकारी कामाचा नमुनासरकारी कामकाज कसे चालते, याचा नमुना म्हणून या कार्यालयाकडे पाहावे लागेल. वार्षिक १ कोटी रुपयांच्या खर्चात १३ जिल्ह्यांचे कामकाज तेथे चालत होते. मानव विकास आयुक्तपदाची माझी मुदत संपल्यानंतर हे कार्यालय बंद पडले आहे. यंत्रणेच्या अध्यक्षपदी सक्षम व्यक्तीची निवड होणे गरजेचे होते; परंतु दुर्दैवाने तसा निर्णय घेण्यात आला नाही.- कृष्णा भोगे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी