शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

क्वीन्स नेकलेस अखेर लखलखणार !

By admin | Updated: August 13, 2015 03:01 IST

महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत.

मुंबई : महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत. त्यामुळे रया गेलेला मुंबापुरीचा क्वीन नेकलेस आता पुन्हा एकदा पिवळ्या दिव्यांनी लखलखणार आहे. मुंबईची गेलेली शोभा परतणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाने मरिन ड्राइव्हच्या रस्त्यांवर पुन्हा जुनेच पिवळे दिवे लावण्याचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाला दिले होते. यावर एनर्जी एफिशन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने न्यायालयात पिवळे एलईडी दिवे लावण्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयाने मरिन ड्राइव्हवर पिवळे एलईडी दिवे लावण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनीही एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेडला मरिन ड्राइव्हवर पिवळे एलईडी दिवे लावण्याच्या सूचना केल्या आहेत.(प्रतिनिधी)एलईडी वापरल्यास १० कोटी युनिट वीज वाचेल : एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर आला होता. शिवसेनेने क्वीन नेकलेसवरील दिवे बदलण्यास विरोध दर्शविला असतानाच ही योजना पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारी आणि महापालिकेचा पैसा वाचविणारी असल्याचा सूर भाजपाने लावला होता. रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर सुरू केल्यानंतर १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता. भाजपप्रणीत योजनेला शिवसेनेने विरोध दर्शविल्याने त्याचे राजकारणात पडसाद उमटले होते.