शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गगनयानाच्या बूस्टरची गुणवत्ता वालचंदनगरमध्ये होणार सिद्ध, देशातील पहिलीच यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 06:23 IST

Gaganyan : गगनयान हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे.

- निनाद देशमुख पुणे : गगनयान हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे. बूस्टर उभारणीबरोबरच आता बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहेत. केवळ दीड वर्षात हा प्रकल्प कंपनीने उभारला असून, अशी क्षमता असणारी वालचंदनगर कंपनी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. २०२० मध्ये ही मोहीम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे गगनयानाचे प्रक्षेपण लांबले. असे असले तरी या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठविण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या भारताच्या बाहुबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. बूस्टर बनविण्याबरोबरच बूस्टरची क्षमता तपासण्याचा प्रकल्पही कंपनीत उभारला आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निदेशक एस. सोमनाथ तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे उद्घाटन १८ डिसेंबरला कंपनीच्या आवारात होणार आहे.क्र्यू एस्केप सिस्टिमही करणार तयारगगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविण्यासाठी क्र्यू एस्केप सिस्टिमही कंपनीत तयार करण्यात येत आहे. यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असलेला भाग हा यानापासून दूर होईल. हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. चांद्रयान मोहिमेतही महत्त्वाची भूमिका आम्ही पार पाडली होती. बूस्टर गुणवत्ता चाचणी प्रकल्पाबाबत इस्रोने मागणी केली होती. त्यानुसार केवळ दीड वर्षात आम्ही हा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पामुळे वेळेत बूस्टरची गुणवत्ता तपासता येणार आहे. यामुळे अंतराळ मोहिमेतील अपघात टाळता येणार आहे.    - चिराग दोषी,     व्यवस्थापकीय संचालक,     वालचंदनगर इंडस्ट्रीज  

टॅग्स :isroइस्रो