मुंबई : खासगी, मनपा, तसेच राज्य सरकारच्या रूग्णालयात वैद्यकीय सामुग्री आणि औषधांच्या किमती बोर्डवर लिहिणे बंधनकारक केले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत केली. औषधी आणि सामुग्रीची नेमकी किंमत रुग्णांना माहिती नसते. त्यामुळे त्यांची लूट केली जाते, याबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, सरदार तारासिंग आदींनी उपस्थित केली होती. (प्रतिनिधी)
औषधांच्या किमती फलकावर लावा
By admin | Updated: August 1, 2015 01:14 IST