शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
2
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
3
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
4
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
5
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
6
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
7
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
10
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
11
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
12
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
13
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
15
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
16
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
17
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
18
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
19
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
20
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

राज्य सहकारी बँकेला धक्का

By admin | Updated: May 11, 2015 05:13 IST

गेल्या दोन वर्षांपासून संकटातून जात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आणखी एक धक्का बसला आहे.

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून संकटातून जात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आणखी एक धक्का बसला आहे. या बँकेने थकबाकीपोटी विक्रीला काढलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा व्यवहार सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा कारखाना मागील ७ ते ८ वर्षांपासून बंद होता. सुमारे ९.९० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याच्या वसुलीसाठी राज्य सरकारी बँकेने २०११मध्ये कारखाना विक्रीला काढला. कोलकाता येथील दत्त शुगर या कंपनीने ३० कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी कंपनीने ७५ लाख बँकेतही जमा केले. परंतु या व्यवहाराच्या विरोधात कारखान्याच्या प्रशासक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने बँकेची बाजू ग्राह्य धरत कारखाना विक्रीस परवानगी दिली होती. याविरोधात प्रशासक मंडळाने सर्वोच्च न्यायालयामार्फत या व्यवहारावर स्थगिती आणली. शिवाय बँक कमी किमतीत कारखाना विकत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णयरद्द ठरवत कारखान्याचा विक्री व्यवहार थांबवण्याचा आदेश दिला. शिवाय संचालक मंडळाने आपल्या अधिकारात नवा विक्री व्यवहार करावा, असा आदेशही न्यायालयाने नुकताच दिला आहे. न्यायमूर्ती दवे यांनी प्रशासक मंडळास ‘तुम्ही ३० कोटींपेक्षा जास्त किंमतीत कारखाना विकू शकता काय’ असे विचारले असता प्रशासक मंडळाने तशी तयारी दर्शवली. भैरवनाथ शुगर कंपनीने ५० कोटी रुपयांना कारखाना विकत घेण्याचे मान्य केल्याचे पुरावे मंडळाने न्यायालयात सादर केले. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर न्यायमूर्तींनी बँकेच्या व्यवहारावर ताशेरे ओढताना ‘पूर्वीच्या व्यवहारात काहीतरी काळेबेरे असल्याचे दिसते,’ असे निरीक्षण नोंदविले. (प्रतिनिधी)अशा प्रकारची पहिलीच घटना राज्य सहकारी बँकेने आजवर २५ सहकारी कारखान्यांची विक्री केली असून, हे कारखाने खासगी क्षेत्राला विकून आपल्या कर्जाची भरपाई करून घेतली आहे. परंतु संतनाथने राज्य सहकारी बँकेच्या व्यवहारावर आक्षेप घेत तो रद्द करवून आणला. अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून, या घटनेचे राज्याच्या सहकार क्षेत्रात मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कर्ज वसुलीपेक्षा आमची संपूर्ण २८३ एकर जमीन आणि कारखाना विकण्यात जास्त रस होता. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेला फटकारले. आतापर्यंतच्या व्यवहारात बँकेने पारदर्शकपणे आम्हाला माहिती दिलेली नाही. कारखान्याची दीडशे एकर जमीन विकून बँकेचे थकीत कर्ज फेडण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी कारखान्यावरील नेमके कर्ज, त्याचे व्याज असा अधिकृत तपशील आम्हाला द्यावा.- शिवाजी संकपाळ, संचालक,संतनाथ सहकारी साखर कारखाना