शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘खरेदी’ केलेले साहित्य पोहोचलेच नाही

By admin | Updated: April 18, 2017 05:37 IST

सामाजिक न्याय विभागात झालेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या खरेदीतील घोटाळ्यांच्या सुरसकथा आता समोर येऊ लागल्या आहेत

यदु जोशी , मुंबईसामाजिक न्याय विभागात झालेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या खरेदीतील घोटाळ्यांच्या सुरसकथा आता समोर येऊ लागल्या आहेत. खरेदी केलेल्या साहित्यापैकी निम्मे साहित्य प्रत्यक्षात मागासवर्गीय मुलांच्या शाळा, वसतिगृहांना पोहोचलेच नाही, अशी माहिती आहे. या बाबत सखोल चौकशी केल्यास अनेक बोगस व्यवहार समोर येऊ शकतात. राज्यात २८३ वसतिगृहे, ५७ निवासी शाळा अशी एकूण ३४० संख्या असताना २०१२-१३ मध्ये १२ कोटी ९० लाख रुपयांचे ४१८ वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यात आले. अत्यंत घाईघाईने आणि कोणतेही सर्वेक्षण वा गरज न तपासताच करण्यात आले, असा ठपका महालेखाकार यांच्या अहवालात ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात शाळा, वसतिगृहांसाठी प्रत्येकी एकच वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात ३४० ठिकाणीदेखील वॉटर प्युरिफायर पोहोचले नाहीत. २७१ वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना संगणक व संगणक प्रशिक्षण पुरविण्याची योजना होती. त्यासाठीच्या संगणक खरेदीसाठी निविदा प्रक्रिया न राबविल्याने तब्बल ३ कोटी ५३ लाख ७४ हजार रुपयांचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला. आधी हिंदुस्थान कॉम्प्युटर्स; मालेगाव या फर्मला ३१ कोटी ८६ लाख रुपयांना या कामाचे कंत्राट देण्यात आले. यावर अन्य एक कंपनी न्यायालयात गेली. त्यानंतर तीन कंपन्यांना ३५ कोटी ४० लाख रुपयांत कंत्राट देण्यात आले. या कंपन्यांनी किती संगणकांचा पुरवठा केला, किती विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले या बाबत निश्चित माहिती सामाजिक न्याय विभागाकडे आजही उपलब्ध नाही. सामाजिक न्याय विभागाची सर्व कार्यालये, वसतिगृहे, शाळांमध्ये शिक्षक, कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी एका कंपनीबरोबर करार करण्यात आला. ३ हजार ८४७ मशीन पुरविल्या म्हणून कंपनीला ७ कोटी ८५ लाख रुपये अदा करण्यात आले. मात्र, यापैकी नेमक्या किती मशीन्स बसविण्यात आल्या याची माहिती विभागाकडे नव्हती, असा शेरा महालेखाकारांनी आपल्या अहवालात दिला होता. वॉटर हिटिंग सिस्टिमच्या खरेदीतही घोटाळे झाले. ७१० वॉटर हिटरचा पुरवठा केल्याबद्दल बंगळुरूच्या एका कंपनीला ५ कोटी ८८ लाख रुपये सामाजिक न्याय विभागाने अदा केले. ही यंत्रे बसविल्याची खात्री करूनच रक्कम अदा करावी, अशी मुख्य अट होती. तथापि, तशी कोणतीही खातरजमा न करताच पैसे देण्यात आल्याचे महालेखापालांच्या अहवालात म्हटले आहे. २०११-१२ मध्ये हे गैरप्रकार घडले. ७३३ पैकी ६८६ वॉटर हिटिंग सिस्टिम बसविण्यात आल्याचा अहवाल नंतर सामाजिक न्याय विभागाने महालेखापालांकडे दिला. मात्र, पैसे देण्यापूर्वी तशी खातरजमा करण्यात आली नव्हती. घोटाळ्यांच्या चौकशीची मागणीसामाजिक न्याय विभागाचे तत्कालिन आयुक्त आर.के.गायकवाड, सहसचिव उत्तम लोणारे, तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पीए प्रशांत अल्याडवार आणि राज्यातील एका विद्यमान मंत्र्यांचे आवडते ‘लाल’ म्हणून प्रसिद्ध असलेले एक कंत्राटदार यांची सामाजिक न्याय विभागातील घोटाळ्यांप्रकरणी चौकशी करण्याची मागणी लालसेना या संघटनेने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.वॉटर प्युरिफायर, संगणक प्रशिक्षण, बायोमेट्रिक सिस्टिम, वॉटर हिटिंग सिस्टिम, सोलार कंदिल, एलसीडी टीव्ही, इन्व्हर्टरच्या खरेदीमध्ये १२ कोटी रुपयांहून अधिकची अनियमितता समोर आली. २०११ ते २०१३ या काळात विभागाकडून करण्यात आलेली खरेदी, प्रत्यक्ष वसतिगृह आणि निवासी शाळांना करण्यात आलेला पुरवठा यातील तफावतीची चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांना हटवून पूर्वी या विभागात सचिव राहिलेले दिनेश वाघमारे यांना परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाघमारे यांच्या कार्यकाळात घोटाळे झाले होते. अर्थात त्यात त्यांचा सहभाग असल्याचे कोणत्याही प्रकरणात समोर आले नव्हते.