दापोली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास संशोधक नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांना पद्मश्री द्यावा की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. परंतु इतिहासावर प्रबोधनाचे काम गेली अनेक वर्षे त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांना इतिहास संशोधक म्हणणे चुकीचे होईल. आम्हीही त्यांना इतिहास संशोधक मानत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पुरंदरे यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यामुळे राज्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीका करून पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र आव्हाडांचे ते मत वैयक्तिक असून पक्षाशी त्याचा काही संबंध नाही, अशी सारवासारव प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केली. आता दस्तुरखुद्द पवार यांनीच विरोध केला आहे.जैतापूर प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात काळजी घेण्याऐवजी शिवसेना सत्तेत राहून विरोध करत असेल तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे मत शरद पवार यांनी मांडले. (प्रतिनिधी)
पुरंदरे इतिहास संशोधक नव्हेत - शरद पवार
By admin | Updated: May 9, 2015 01:30 IST