नागपूर : नरखेड तालुक्यातील उमठा येथे घडलेल्या हत्याप्रकरणातील आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. उमेश चिंबा राऊत (१९) असे आरोपीचे नाव असून तो उमठा येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने २२ नोव्हेंबर २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अन्वये दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड आणि दंड भरला नाही तर ३ महिने साधा कारावास, अशी शिक्षा ठोठावली होती. उमेशचा भाऊ रत्नाकर व वडील चिंबा यांना दोषी ठरविण्यात आले होते. उमेशने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी त्याचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सुधाकर नेहारे असे मृताचे नाव आहे. खटल्यातील माहितीनुसार, ३० डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास सुधाकर स्वत:च्या घराजवळ बाबू राऊतसोबत बोलत रोडवर उभा होता. आरोपींनी तेथे येऊन सुधाकरला शिवीगाळ केली. उमेशने सुधाकरला ढकलून खाली पाडले. उमेशने सुधाकरच्या डोक्यावर उभारीचा जोरदार प्रहार केला. (प्रतिनिधी)
हत्याप्रकरणात शिक्षा कायम
By admin | Updated: June 2, 2014 05:54 IST