शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

By admin | Updated: August 3, 2016 00:34 IST

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले जात असतानाच; पुणे महापालिकेस दिवसाआड असलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी अवघे २00 एमएलडी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाकडून नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २0 दिवसांपासून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शहरातूनच जात असताना ते पालिकेला मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण रंगले असल्याने अवघ्या ‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र दिसत आहे. >हवे अवघे २00 एमएलडी पाणी पाणीकपात मागे घेऊन पुणे शहराला दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस अवघ्या २00 एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस प्रतिदिन १२५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ११५0 एमएलडी आणि दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी ९५0 एमएलडी पाण्याची गरज आहे. हे जादा पाणी खडकवासला बंद जलवाहिनीतून घेणे शक्य आहे. त्यातच गेल्या २0 दिवसांपासून खडकवासला धरणातून दररोज ११00 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. या पाण्यातील अवघे २00 एमएलडी पाणी शहराला दिवसातून एकदा पुरविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आडमुठेपणा केला नसता तर २0 दिवसांपूर्वीच पाणीकपात मागे घेणे शक्य होते, अशी टीका होत आहे.>श्रेयवादाचा फटका पुणेकरांना का ? जूनच्या अखेरीस खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमध्ये अवघा १.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस सुरू झाल्याने धरणसाठा वाढण्यास सुरुवात झाली होती. या वेळी पाणीसाठा १0 टीएमसीच्या वर जाताच महापौरांनी घाईगडबडीने जलपूजन करून पाणीकपात मागे घेतली असल्याची घोषणा केली. मात्र, पालकमंत्री बापट यांनी त्यास नकार देत आॅगस्ट महिन्यात निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चार टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्यातून पुणेकरांना जादा पाणी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणीसाठा १९ टीएमसीवरमागील वर्षी खडकवासला धरणसाखळीत आॅक्टोबर २0१५ अखेर अवघे १५ टीएमसी पाणी होते. यातील केवळ साडेसात ते आठ टीएमसी पाणीच महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत वापरले आहे. मात्र, या वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांचा पाणीसाठा १९ टीएमसीच्या घरात पोहोचला आहे. तर आणखी दोन महिने चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तर ही धरणे ६४ टक्के भरलेली आहेत. त्यामुळे ही धरणे ८0 टक्के भरल्यानंतर पुढील पावसाचा विचार करून मर्यादित पाणीसाठा धरणांमध्ये ठेवावा लागणार असल्याने हे पाणी पुन्हा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे अत्ता पासून महापालिकेस दररोज 100 एमएलडी जादा पाणी मिळाल्यास पुणेकरांना सहज दररोज एकवेळ पाणी देता येणार आहे.