पुणो : पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्या आदेशानुसार हेल्मेटसक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर त्याविरोधात पुणोकर एकवटले असून, हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. हेल्मेटसक्ती विरोधात लवकर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेल्मेटसक्ती विरोधातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी ग्राहक चळवळीचे अग्रणी कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, नगरसेवक धनंजय जाधव, धीरज घाटे, बाळासाहेब रुणवाल, भोळा वांजळे, इक्बाल शेख यांच्यासह विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मागील वेळेस हेल्मेटसक्ती शहरामध्ये लागू करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यातून प्रचंड विरोध झाला होता. अखेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करणो थांबविण्यात आले होते. नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना जास्तीत जास्त हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करणो आवश्यक असताना अचानकपणो सतीश माथूर यांनी हेल्मेटसक्तीची पुन्हा जोरदार अंमलबजावणी सुरू केली आहे. याविरोधात संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन रविवारी आंदोलन करणार आहेत. (प्रतिनिधी)
कमी अंतरावर सक्ती नको
प्रशासनाने पूर्वसूचना न देता कायदा राबविणो योग्य नाही. सामाजिक संस्थेने एकत्रित येऊन योग्य निर्णय घ्यावा, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे. हेल्मेट वापरणो ही चांगली गोष्ट आहे. पुणो शहरात कमी अंतरावर हेल्मेटसक्ती आवश्यक नाही. हेल्मेटसक्तीला विरोध नाही.
- मोहन जोशी