ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 14 - मेदनकरवाडी येथील राजलक्ष्मी ग्लोरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने जलसंधारण वर आधारित इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे.
सदर देखावा हा दोन गावामधील फरक सांगत आहे. हिवरे बाजार ह्या गावाने पाण्याचे नियोजन केल्याने, त्या गावामध्ये कधीही दुष्काळ पडत नाही. तसेच लोकांच्या सहभागातून जलसंवर्धन ची कामे केली गेली. पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले गेले. पाणी बचतीचा संदेश घरा घरामध्ये पोहचवला गेला. त्यामुळे गावातील शेतकरी सधन झाले.
दुसऱ्या गावामध्ये पाणी बचत केली नाही. पाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने नेहमी दुष्काळ पडला, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले. कुटुंब उद्ववस्त झाली. देखाव्याच्या सजावटी साठी माती, गहू, पेपर रद्दी, काड्या, पेपर असे साहित्य वापरले आहे. कुठेही प्लास्टिक तसेच थर्माकोल चा वापर केलेला नाही. पूर्ण पणे इको फ्रेंडली सजावट केली आहे. पाणी वाचवा जीवन वाचवा , हा संदेश इको फ्रेंडली गणेश उत्सवाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या सजावटीसाठी केवळ सोळा रुपये खर्च झाला असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.