शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 02:55 IST

लॉकडाऊन काळातील प्रकार : बांधकाम क्षेत्रातील घसरण ५० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील पुणे आणि उल्हासनगर या शहरांतील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ८४ टक्के मजुरांना लॉकडाऊन काळात वेतनच मिळाले नसल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) २३.९ टक्क्यांनी घसरले. यात बांधकाम क्षेत्राची घसरण तब्बल ५०.३ टक्के आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात बांधकाम क्षेत्रातील मजुरांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे स्थलांतर केले होते. त्याचा मोठा फटका या क्षेत्राला बसला आहे.

‘हॅबिटेट फॉर ‘ह्युमॅनिटी’ या संस्थेच्या ‘टेर्विलिगर सेंटर फॉर इनोव्हेशन इन शेल्टर’ या केंद्राने कोविड-१९ महामारीचा कामगार व मजुरांवरील परिणाम आजमावण्यासाठी द्रुत सर्वेक्षण केले. महाराष्ट्रातील पुणे आणि उल्हासनगरमधील ९७४ स्थलांतरित मजुरांची मते सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सर्वेक्षणात सहभागी झालेले ४७ टक्के कामगार बांधकाम क्षेत्रातील होते. २३ टक्के कामगार वस्तू उत्पादन क्षेत्रातील, १३ टक्के वस्त्रोद्योगातील आणि १७ टक्के इतर क्षेत्रांतील होते. बांधकाम क्षेत्राचा आकार १०.५ लाख कोटी रुपयांचा असून, कृषिक्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार याच क्षेत्रातून मिळतो. ‘कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनपूर्वी देशात २० हजार बांधकाम प्रकल्प कार्यरत होते. ८.५ दशलक्ष लोकांना यातून रोजगार मिळत होता.

१६ टक्के लोकांना पूर्वी एवढाच रोजगारसर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७१ टक्के उत्तरदात्यांना लॉकडाऊननंतर मजुरी मिळालेली नाही. ६३ टक्के लोकांना त्यांच्या मूळगावी उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अहवालात म्हटले आहे की, लॉकडाऊन लागल्यानंतर बांधकाम क्षेत्रातील केवळ १६ टक्के लोकांना लॉकडाऊनच्या आधीएवढा मोबदला मिळाला. ८४ टक्के लोकांना एक तर अगदीच अत्यल्प मोबदला मिळाला अथवा काहीच मोबदला मिळाला नाही.