शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सैनिकाचे प्राण वाचविण्यासाठी थबकले पुणे...

By admin | Updated: July 29, 2015 00:50 IST

तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकाने जिगर दाखवित ‘ब्रेनडेड’ आईच्या यकृत आणि मूत्रपिंडाचे दान केले. पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावत रस्त्यावरची वाहतूक काही वेळासाठी थांबविली

पुणे : तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकाने जिगर दाखवित ‘ब्रेनडेड’ आईच्या यकृत आणि मूत्रपिंडाचे दान केले. पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावत रस्त्यावरची वाहतूक काही वेळासाठी थांबविली. विमानतळापर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ८ मिनिटांत पूर्ण केला. वायुसेनेने विशेष विमान उपलब्ध करून दिल्याने यकृत अवघ्या सव्वा तासात दिल्लीत पोहोचले आणि त्याने एका सैनिकाचे प्राण वाचले. यकृत आणि किडनीची गरज असलेल्या पुण्यातील दोघांसाठीही अशीच सर्व यंत्रणा हलली. त्यांच्यावरही वेळेत उपचार झाले. ललिता सरवदे या जिगरबाज सिग्नलमॅन गणेश यांच्या आई. १८ जुलैला एका अपघातानंतर त्यांना पुण्यातील लष्कराच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारास प्रतिसाद मिळेना. २६ जुलैला डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केले. आईच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी गणेश यांनी आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. याच वेळी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात किडनी आणि यकृताची गरज असल्याचे कमांड रुग्णालयात कळविण्यात आले होते. त्यामुळे ललिता सरवदे यांचे मूत्रपिंड आणि यकृत दिल्लीला पाठविण्याचे ठरले. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत कायदेशीर बाबी पूर्ण करणे आवश्यक होते. वानवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर पोलिसांनीही तातडीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. प्रश्न होता प्रवासाचा. ठराविक कालावधीत अवयवांचे प्रत्यारोपण होणे गरजेचे होते. पुण्याच्या वाहतुकीतून विमानतळापर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक होते. यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी पुढाकार घेतला. रुग्णवाहिकेसाठी रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्माण केला. कमांड रुग्णालयापासून लोहगाव विमानतळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. रुग्णवाहिका विनाथांबा अवघ्या ८ मिनिटांमध्ये विमानतळावर पोहोचली. येथे भारतीय वायुसेनेचे विशेष विमान सज्ज होते. विमानाने लगेचच उड्डाण भरले आणि १ तास २० मिनिटांमध्ये दिल्लीला पोहोचले. तेथील लष्करी रुग्णालयात मृत्यूशय्येवर पडलेल्या एका माजी सैनिकावर यकृत आणि सैनिकाच्या मुलावर मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्याबरोबर सरवदे यांच्या आणखी एका मूत्रपिंडाचे पूना रुग्णालयातील एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. डोळे नेत्रपेढीमध्ये देण्यात आले.अवयवांच्या प्रवासाठी पुण्यात बनला ग्रीन कॉरिडॉर पुण्याच्या गजबजलेल्या वाहतुकीतून अवयव वेळेत विमानतळावर पोहोचावेत म्हणून वाहतूक पोलिसांकडून ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनविण्यात आला होता. कमांड रुग्णालयापासून लोहगाव विमानतळापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे अवयव नेणाऱ्या रुग्णवाहिकेने कोठेही न थांबता अवघ्या ८ मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण केला होता. वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिता हिवारकर यांनी हा ‘ग्रीन कॉरिडॉर’ उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.पहिल्यांदाच ‘मल्टिपल’ अवयवदानलष्कराच्या कमांड रुग्णालयातून पहिल्यांदाच एका ‘ब्रेनडेड’ व्यक्तीच्या विविध अवयवांचे दान करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या ‘मल्टिपल’ अवयवदानातून दिल्लीतील रुग्णांवरही प्रत्यारोपण करणे शक्य झाले.चार जणांना मिळाले जीवदानललिता सरवदे यांच्या अवयवदानामुळे मृत्यूशय्येवर पडलेल्या तीन जणांना जीवदान मिळाले आहे.अवयव पुण्याहून दिल्लीला पाठविण्यासाठी शहरातील प्रवास पूर्ण करण्यासाठी रस्ते रिकामे असणे गरजेचे होते. त्यासाठी लष्कराच्या कमांड रुग्णालयाने आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आम्ही अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णालयाअगोदर एक एस्कॉर्ट मोबाईल व्हॅन दिली. या व्हॅनने विमानतळाकडे जाणारे रस्ते रिकामे केले. त्यामुळे अर्धा तासाचा हा प्रवास अवघ्या ८ मिनिटांमध्ये पूर्ण झाला. पुण्यात पहिल्यांदाच ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला.- सारंग आवाड,उपायुक्त, वाहतूक पोलिस विभागविमानतळापर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास पार केला अवघ्या ८ मिनिटांत येथे भारतीय वायुसेनेचे विशेष विमान सज्ज होते. विमानाने लगेचच उड्डाण भरले आणि १ तास २० मिनिटांमध्ये दिल्लीला पोहोचले. तेथील लष्करी रुग्णालयात मृत्यूशय्येवर पडलेल्या एका माजी सैनिकावर यकृत आणि सैनिकाच्या मुलावर मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ठराविक कालावधीत अवयवांचे प्रत्यारोपण होणे गरजेचे होते.