शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनाचा ‘पुणे पॅटर्न’ फेल

By admin | Updated: September 9, 2016 02:48 IST

जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकरिता अमोनियम बायकार्बाेनेटच्या मदतीने पुणे पॅटर्न अर्थात घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या पालिकेच्या

मीरा रोड : जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकरिता अमोनियम बायकार्बाेनेटच्या मदतीने पुणे पॅटर्न अर्थात घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या पालिकेच्या आयत्यावेळच्या आवाहनास भाविकांचा तुरळक प्रतिसाद मिळाला. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी सहा प्रभाग समिती कार्यालयांतून ५५ किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले. मात्र, किती भाविकांनी ते नेले आणि या पद्धतीने विसर्जन केले, याची नेमकी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. विशेष म्हणजे एकट्या प्रभाग समिती-१मधून ५० किलो बायकार्बाेनेट देण्यात आले. मुळात पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यासह पालिकेने कृत्रिम तलावांनाही बगल दिल्याने पालिकेचे एकंदर पर्यावरणप्रेम दिखाऊ असल्याची टीका होत आहे. उत्सवासाठी गणेशमूर्ती सर्रास प्लास्टर आॅफ पॅरिसच्या बनवल्या जातात. त्यासाठी वापरला जाणारा रंगही घातक रसायनांचा असल्याने तलाव, नदी, खाडी, समुद्रात विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या सरकारच्या सूचनांना पालिकेने आधीच केराची टोपली दाखवली. कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळत असताना त्यालाही तिलांजली दिली. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी महापालिकेने पुणे पॅटर्नप्रमाणे घरच्या घरी गणेश विसर्जन करण्याचे आवाहन महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील व आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी महापालिकेच्या वतीने नागरिकांना केले. घरी विसर्जन करण्यासाठी पाण्यात मिसळण्यासाठी लागणारे अमोनियम बायकार्बोनेट पालिकेने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात भाविकांसाठी उपलब्ध करून दिले. अशा उपक्रमासाठी जनजागृती करणे आवश्यक होते. आयत्यावेळी असे आवाहन करून काहीही साध्य होत नाही. कारण, भाविक आधीच मूर्तीची नोंदणी करतात. छोटी मूर्ती आणून घरीच बादलीत विसर्जन करण्याचे आवाहन करायचे म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असला तरी अशा उपक्रमांसाठी नगरसेवकांना सहभागी करून घेणे आवश्यक होते. मात्र, पालिका प्रशासनाने नगरसेवकांना डावलल्याने शिवसेना नगरसेवक जयंतीलाल पाटील यांनी आयुक्तांकडे थेट लेखी तक्रारच केली होती. (प्रतिनिधी)