शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे शोकाकुल तरूणाची आत्महत्या

By admin | Updated: January 11, 2017 08:55 IST

पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकणा-या हर्षवर्धनसिंगच्या कुत्र्याच्या काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला, त्याच निराशेतून त्याने आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - माणसाचा इमानी सहकारी असलेला श्वान म्हणजेच कुत्र्याने आपल्या मालकाच्या प्रेमापोटी त्याचा जीव वाचवल्याची किंवा जीव दिल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या वाघ्या कुत्र्याचेही निधन झाले, ही कहाणी तर सर्वश्रुत आहेच. मनुष्य आणि कुत्र्याच्या प्रेमाच्या अनेक कथा असतानाच पुण्यात कुत्र्याच्या मुत्यूमुळे शोकाकुल झालेल्या एका तरूणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 
हर्षवर्धनसिंग राघव असे त्या २२ वर्षीय तरूणाचे नाव असून तो खडकी येथील रहिवासी होता. सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकणा-या हर्षवर्धनसिंगने काल रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ' आपल्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे' त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. 
हर्षवर्धनसिंग मुळचा छत्तीसगडचा राहणारा होता. मागील दोन वर्षांपासून तो शिक्षणासाठी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या हॉस्टेलमधे राहत होता. शनिवार आणि रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी हडपसरला नातेवाईकांच्या फ्लॅटमध्ये रहायला जायचा. पुण्यात राहत असला तरी हर्षवर्धनसिंगला त्याच्या छत्तीसगडमधील घरातील कुत्रा, बोस्कीचा खूप लळा होता.  मात्र, काही दिवसांपूर्वी बोस्कीचा मृत्यू झाला, त्यामुळे हर्षवर्धनसिंग निराश होता. 
अखेर शोकाकुल मनस्थिथीतच हर्षवर्धनसिंगने नातेवाईकांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली. ‘मी माझ्या बोस्कीकडे जात आहे. त्याबद्दल कोणाला दोष देऊ नये’, असे त्याने  सुसाईड नोटमध्ये नमूद केले. हडपसर पोलिस ठाण्यात हर्षवर्धनच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.