पिंपरी : ‘‘पुणेकरांची पावती मिळाली, तर च त्या कलाकाराच्या नावाला लौकिक मिळतो. लवंगी मिरची कोल्हापुरची ही पहिली लावणी मी पुण्यात गायली. त्यानंतर पुण्यात दर महिन्याला पाच कार्यक्रम होत होते आणि त्यातूनच मी लावणी सम्राज्ञी झाले,’’ असे मत ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. रोटरी क्लब-चिंचवड यांच्या वतीने आयोजित शिशिर व्याख्यानमालेत शनिवारी चव्हाण यांना ‘माय माऊली जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी चव्हाण बोलत होत्या. ढोलकी वादक विजय चव्हाण, क्लबचे अध्यक्ष संजय खानोलकर, प्रकल्प प्रमुख राजेंद्र पोफळे, सचिव सुनील गरुड उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या, ‘‘माझे माहेर पुणे आहे. मी पुण्यात केव्हा ही येऊन माझे गाणे सादर करत असे, माहेरात जे मिळते ते सगळे मला पुण्याने दिले, त्यामुळे माझे पुण्यावर विशेष प्रेम आहे.’’ जोग म्हणाले, ‘‘ मला चव्हाण यांचा सत्कार करण्याचे भाग्य मिळाले. हेच मोठे आहे. त्यांनी कलेची साधना केली आहे.’’ या वेळी प्रेक्षकांनी चव्हाण यांच्याकडे लावणी म्हणयाचा आग्रह धरला, त्यावेळी त्यांनी आपल्या बहरदार आवाजात ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा, ही लावणी सादर केली. प्रेक्षकांनी टाळ््यांचा गजरात लावणीला दाद दिली. ‘राजसा घ्यावा गोविंद विडा’ या लावणीने सुरुवात झाली. त्यानंतर ‘आई नेसव मला शालू नवा’, ही लावणी भाग्यश्री अभ्यंकर यांनी गायली, त्यांना ढोलकीची साथ नितीन शिंदे यांनी दिली. ‘नाचतो डोंबारी ग’ या लावणी अंजली मराठे यांच्या लावणीला वन्समोअर मिळाला. केदार मोरे यांनी ढोलकी वादनाने भारावून सोडले. दर्शना जोग, राजेंद्र साळुंके, केदार परांजपे यांनी सुरेख साद दिली. मंजिरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) ४‘खेळताना रंग बाई ग होळीचा, ‘पाडाला पिकला आंबा’ या लावणीने तर सभागृह दणाणून सोडले. प्रत्येक लावणीला वन्समोअर मिळत होत. तर टाळ््या आणि शिट्यांनी सभागृह दणाणून गेले होते. ‘सोळाव वरीस धोक्याच ग धोक्याच’ या बहरदार लावणीला टाळ््यांचा कडकडाट झाला.
पुण्यानेच मला लावणीसम्राज्ञी केले
By admin | Updated: January 18, 2015 01:32 IST