शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - मद्यधुंद पत्नीने पतीवर टाकले उकळते तेल

By admin | Updated: July 17, 2017 22:06 IST

सहा वर्षांपूर्वी दोघांची पुणे-मुंबई प्रवासामध्ये रेल्वेत ओळख झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांपूर्वीच कोर्टमँरेज करून त्यांनी संसाराला सुरूवात केली होती

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : सहा वर्षांपूर्वी दोघांची पुणे-मुंबई प्रवासामध्ये रेल्वेत ओळख झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांपूर्वीच कोर्टमँरेज करून त्यांनी संसाराला सुरूवात केली होती. मात्र एके दिवशी मुंबईवरून पुण्यात पत्नीला भेटायला येणे त्याला चांगलेच महागात पडले. किरकोळ वादावादीतून संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीवर उकळते तेल ओतल्याची घटना वानवडी येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नीला अटक केली.भरत अर्जुनराम शेरसियसा (वय २६) असे जखमी पतीचे नाव आहे. पत्नी जया भरत शेरसिया (वय ३८) हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत हा मुंबईला चेंबुर येथे एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. जया ही पुण्यात वानवडी येथील सिक्रेट टाऊन येथे रहाते. या दोघांची २०११ मध्ये पुणे-मुंबई प्रवासामध्ये रेल्वेत ओळख होऊन त्याचे प्रेमातरूपांतर झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी कोर्टमॅरेज केले. महिन्यातून एक दोन वेळेस तो पुण्यात तिला भेटायला येतो. शनिवारी तो पुण्यात आल्यानंतर रात्री त्यांनीभरपूर दारू प्यायली. गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्यामध्ये अचानक वाद सुरू झाला. त्यानंतर भरत हा झोपी गेला.परंतु, चिडलेल्या जयाने स्वयंपाक घरात जाऊन गँसवर तेल गरम करून ते उकळतेतेल त्याच्या अंगावर टाकले. शरीर भाजल्याने जोरात ओरडत भरतने शेजाच्यांना मदत मागितली, परंतु त्याला मदत मिळाली नाही. शेवटी तिच्या तावडीतून सुटका करून घेऊन घरातून बाहेर आला. रिक्षा पकडून रुग्णालयात गेला. यामध्ये भरतीची पाठ आणि पोट १० टक्के भाजले आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. जयाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक हंचाटे करत आहेत.