मुंबई : पुणो, जळगाव, बीड आणि अहमदनगर येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणा:या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे. राहुल गाडे (28) असे त्याचे नाव आहे. कधी बडय़ा राजकीय पुढा:याचा पीए तर कधी शासकीय अधिकारी असल्याचे भासवून त्याने सुशिक्षित बेरोजगारांना सुमारे दिडेक कोटींचा चुना लावल्याचे गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.
गेल्या आठवडय़ात मरिनड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मालमत्ता कक्षाने गाडेचा पर्दाफाश केला. पुणो विद्यापीठातील विद्याथ्र्याला त्याच्या एका मित्रने गाडेचे नाव सुचविले होते. गाडे मंत्रलयात मोठय़ा हुद्दय़ावर कार्यरत असून त्याचे अनेक विभागांमध्ये वजन आहे, असा समज विद्याथ्र्याच्या मित्रला होता. पुढे नोकरीसाठी या विद्याथ्र्याने गाडेची भेट घेतली. नगरमध्ये तलाठय़ाची जागा खाली आहे, चार लाख देण्याची तयारी असेल तर तुम्हाला ती जागा मिळवून देतो, असे गाडेने या विद्याथ्र्याला सांगितले. त्यानुसार विद्याथ्र्याने साडेतीन लाख रुपये उभे केले. 16 ऑगस्टला दोघे मंत्रलयाजवळ भेटले. तेव्हा गाडे सफेद रंगाच्या व पिवळ्या दिव्याच्या गाडीतून आला होता. तुमच्या नावाची ऑर्डर घेऊन येतो, असे सांगून गाडे विद्याथ्र्याकडील साडेतीन लाखांची रोकड घेऊन निघून गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. तसेच त्याचा फोनही बंद येऊ लागला. त्यामुळे विद्याथ्र्याला गाडेबाबत संशय वाटू लागला. त्याने मंत्रलयात जाऊन संबंधित विभागात गाडेबाबत चौकशीही केली. तेव्हा येथे गाडे नावाचा अधिकारी कार्यरत नाही, अशी माहिती विद्याथ्र्याला मिळाली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्याने तक्रार दिली.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. तेव्हा मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना गाडे चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत येणार, अशी माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक दिनकर भोसले, दिलीप फुलपगारे, नितीन पाटील आणि पथकाने सापळा रचून गाडेला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा कबूल केला. (प्रतिनिधी)
च्राहुलने महाराष्ट्रातल्या बडय़ा राजकीय पुढा:यांचे, मंत्र्यांचे आवाज काढून अनेकांची फसवणूक केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. त्या दृष्टीने पोलीस त्याच्याकडे चौकशी करणार आहेत. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
च्बारामतीच्या भिगवन रोडवर राहणा:या, उदरनिर्वाहासाठी हमाली करणा:या आणि जेमतेम सातवी शिकलेल्या राहुलने मिमिक्री व बोलबच्चनगिरीच्या जोरावर अत्यंत सफाईदारपणो गुन्हे केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. पिवळ्या दिव्याची सफेद गाडी, पांढरा शुभ्र पोशाख यानेही तो अनेकांवर भुरळ घालत असे.