शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शॅगीच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती भोपळा!

By admin | Updated: April 18, 2017 05:51 IST

बोगस कॉल सेंटर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीस अटक करून आठवडा उलटला, तरी त्याच्या चौकशीतून पोलीस अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळवू शकलेले नाहीत

ठाणे : बोगस कॉल सेंटर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीस अटक करून आठवडा उलटला, तरी त्याच्या चौकशीतून पोलीस अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळवू शकलेले नाहीत. अवघ्या २४ वर्षांचा हा आरोपी १० दिवसांपासून पोलीस यंत्रणेला गोलगोल फिरवत आहे.अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी आॅक्टोबर २०१६मध्ये केला होता. या टोळीचा सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी तेव्हापासूनच फरार होता. ठाणे पोलिसांसह इंटरपोल आणि अमेरिकेच्या एफबीआयनेदेखील शॅगीच्या अटकेसाठी जाळे विणले होते. ८ एप्रिल रोजी दुबईतून आलेल्या शॅगीला मुंबई विमानतळावर ठाणे पोलिसांनी अटक केली. शॅगीची अटक ठाणे पोलिसांसाठी नक्कीच महत्त्वाची होती; पण, त्याच्या चौकशीतून पोलीस काहीही साध्य करू शकले नाहीत.कॉल सेंटर घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यापासून पोलीस यंत्रणेसह प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनीच घोटाळ्याचे वेगवेगळे आकडे मांडले. आकड्यांमध्ये तफावत असली तरी १०० कोटींपेक्षा कमी रकमेचा अंदाज कुणीच वर्तवला नाही. ८ एप्रिलपर्यंत पोलिसांच्या ताब्यात केवळ सहआरोपी होते. त्यामुळे घोटाळ्यातील रकमेच्या वसुलीचा प्रश्न समोर आला नाही. आता शॅगीच्या अटकेनंतर स्वाभाविकपणे हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप ते यशस्वी ठरले नाहीत. गुन्हे शाखेच्या वरिष्ठांपासून आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच शॅगीची चौकशी केली. पण, पैसा तर सोडा, या घोटाळ्याशी संबंधित आरोपींची माहिती देण्यासाठीही शॅगीने तोंड उघडलेले नाही. शॅगीची १० बँकांमध्ये खाती आहेत. या खात्यांमध्ये जवळपास ४० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कॉल सेंटरमधून आपल्या वाट्याला फार कमी रक्कम यायची. ही रक्कम आधीच खर्च झाली असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. भारतात येण्यापूर्वी त्याने संपूर्ण मालमत्तेसह रोख रकमेचीही विल्हेवाट लावली, याची खात्री पोलिसांना जवळपास पटली आहे. त्यामुळेच १० दिवसांच्या चौकशीनंतरही पोलिसांचे हात रितेच आहेत. न्यायालयासमोर शॅगीने पोलीस कोठडीपर्यंत विरोध केलेला नाही. उलटपक्षी, तुरुंगापेक्षा पोलीस कोठडी बरी, असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांसमोर सांगितले आहे. (प्रतिनिधी)