शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

डाळींनी गाठली शंभरी

By admin | Updated: June 19, 2016 02:18 IST

अत्यल्प पावसामुळे राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरले असून, उत्पादन घटल्याने एपीएमसीच्या धान्य मार्केटमध्ये डाळींची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डाळींचे

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईअत्यल्प पावसामुळे राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरले असून, उत्पादन घटल्याने एपीएमसीच्या धान्य मार्केटमध्ये डाळींची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डाळींचे घाऊक दरही कडाडल्याने त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. गेल्या आठवड्यात धान्य मार्केटमध्ये दिवसाला डाळींचे सरासरी १०९ ट्रक व २७६ टेम्पोंची आवक झाली होती. परंतु डाळींचे उत्पन्न घटल्याने या आठवड्यात दिवसाला डाळींचे सरासरी १०३ ट्रक २७० टेम्पोची आवक झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारातील डाळींचे दर प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपयांच्या घरात गेले आहेत. मागणी-पुरवठ्याचे गणित जुळेनागेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने बळीराजावर मोठ्या प्रमाणात संकट ओढवले आहे. पाण्याअभावी उत्पादन घटल्याने मागणी तसा पुरवठा केला जात नाही. डिझेलचे वाढते दर, ट्रान्सपोर्टच्या वाढत्या खर्चामुळेही किमतींमध्ये वाढ झाली आहे. साठेबाजांवर कठोर कारवाई केली तर नक्कीच मागणी तसा पुरवठा करता येणे शक्य आहे. तूरडाळीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्यादृष्टीने उत्पादन न झाल्याने मागणीनुसार पुरवठा होत नसून किमती वाढल्या आहेत., असे ग्रेन राईस अ‍ॅण्ड आॅईल सिडस् मर्चंट असोसिएशन (ग्रोमा)चे सचिव पोपटलाल भंडारी यांनी सांगितले.सर्वच डाळींच्या किमतीत वाढ झाली असून, चणाडाळ १०० ते १३० रुपये किलो, मसूर डाळ ८० ते १०० रुपये, मूगडाळ ९० ते १२० रुपये, उडीद डाळ १५५ ते १८० रुपये किलो, वाल ८० ते ११० रुपये किलो, वाटाणे ६० ते ८० रुपये किलो आणि शेंगदाणे ९० ते १४० रुपये किलो दराने मिळत आहेत. घाऊक बाजारपेठेतील दरडाळप्रतिक्विंटल (कमीत कमी -जास्तीत जास्त)हरभरा ७,७०० - १०,६००मसूर डाळ६,२०० - ७,३००माठ ६,५०० - ७,३००मुग डाळ७,६०० - ८,१००उडीद डाळ१४,८०० - १६,०००वाल ७,१०० - ७,८००पांढरा वाटाणा३,६०० - ४,०००शेंगदाणे६,००० - ९,०००