सावंतवाडी : आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा विरोध डावलून कोण काम करीत असेल तर शांत राहू नये, असे कार्यकर्त्यांना सुनावत येत्या दहा दिवसांत जेटीची भिंत प्रशासनाने न काढल्यास स्वत: भिंत हटवण्यासाठी आरोंदा येथे जाईन. पुढची सर्व जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील, असा इशारा काँॅग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, राज्यमंत्र्याला किती अधिकार असतात हे त्यांनी अगोदर पाहावे, राज्यमंत्री अधिकाऱ्यालाही आदेश देता येत नाही. मात्र, आताचे पालकमंत्री सहायक जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि जेवणावळी वाढतात. जेवणावळी व हार तुऱ्यांचा खर्च हा ठेकेदाराच्या खिशातून होत असून याची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अभ्यास करा व नंतरच बोलाराणे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. देसाई यांनी उद्योग विभागाचा अभ्यास करावा नंतर बोलावे. विमानतळ करतानाच रस्ते करायचे का, असे विचारणाऱ्यांचे किती हे अज्ञान, असे सांगत माझ्यावर टीका केल्यास उसन्या दाताच्या कवळ्या माघारी जाणार नाहीत.
दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन - राणे
By admin | Updated: December 30, 2014 01:25 IST