शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकील अजय मिसर यांच्या ‘हत्त्येचा कट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 02:07 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील सरकारी वकील रोहिणी सालीयन यांचे तत्कालीन सहकारी व दहशतवादविरोधी पथकाचे विद्यमान सरकारी वकील अजय मिसर

नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोटातील सरकारी वकील रोहिणी सालीयन यांचे तत्कालीन सहकारी व दहशतवादविरोधी पथकाचे विद्यमान सरकारी वकील अजय मिसर यांच्या हत्त्येचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कट रचला जात असल्याचे पत्र मुंबई मोक्का न्यायालयाचे न्या़ ए़ एल़ पानसरे यांना पाठविण्यात आले होते़ त्यात कटासाठी वापरलेल्या मोबाइल क्रमांकाच्या उल्लेखावरून संबंधित कैद्याची चौकशी करण्यात आली असून, तो बाफना खून प्रकरणातील असल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर अ‍ॅड. मिसर यांची सुरक्षा वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी सांगितले़अ‍ॅड़ मिसर यांच्या हत्त्येचा कट मध्यवर्ती कारागृहातील मोक्का कैदी बॅरेकमध्ये रचला जात असल्याची तसेच कोणत्या मोबाइलवरून त्याबाबत संभाषण झाले त्याची माहिती मुंबई मोक्का न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे पत्राद्वारे पाठविली होती़ त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया, अ‍ॅडिशनल डीजी क्राईम मीरा बोरवणकर तसेच मुख्यमंत्र्याना याबाबत माहिती दिल्यानंतर याबाबत तातडीने सूत्रे हलविण्यात आली़ नाशिकचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी या प्रकरणी जलद तपास केला़ या पत्रातील मोबाइल क्रमांकावरून संबंधिताचा शोध घेतला असता तो ओझर येथील धान्य व्यापाऱ्याचा मुलगा बिपीन बाफणा खुनातील तसेच मोक्काचा आरोपी असल्याचे समोर आले़ अ‍ॅड़ मिसर यांच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली असून, २४ तास एक गनमॅन व तीन कॉन्स्टेबल दिले जाणार आहेत़ (प्रतिनिधी)