शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

By admin | Updated: August 13, 2015 03:39 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे.

- संदीप प्रधान,  मुंबईकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या योजनेकरिता केंद्र सरकार एक हजार कोटी रुपये देणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन व संबंधित शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांच्या नावाची शिफारस करायची होती. याकरिता स्पर्धेत ४४ शहरे होती. मात्र या योजनेकरिता प्रत्येक शहरातील महापालिकेला पाच वर्षांत २५० कोटी रुपये उभे करायचे होते. साहजिकच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूरयासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम शहरांनी बाजी मारली. येत्या दोन-तीन वर्षांत महापालिका निवडणुका असलेल्या शहरांचाच स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला गेला, अशी टीका केली गेली. नांदेड शहराचा समावेश न झाल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. केंद्राची दुसरी योजना शाश्वत पाणीपुरवठ्याची आहे. या योजनेत पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली करण्याची यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त वस्ती असलेल्या ४३ शहरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या शहरांखेरीज अन्य शहरांचा प्राधान्याने या योजनेत समावेश केला जाईल, असे नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. केंद्राच्या एक हजार कोटी रुपयांखेरीज उर्वरित एक हजार कोटी रुपये उभे करताना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचा वाटा किती असेल, त्याचे सूत्र लवकरच नक्की केले जाईल. राज्यातील बहुतांश शहरातील लोकसंख्येला त्यांच्या गरजेइतका पाणीपुरवठा होत नाही. काही शहरांना पाणीपुरवठा पुरेसा केला जातो. मात्र वितरण व्यवस्था सदोष असल्याने नुकसान होते. मराठवाडा व विदर्भातील छोट्या शहरांवर या योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या शहरांचा समावेशसोलापूर, मीरा-भायंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, ईचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भूसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया,सातारा, बार्शि, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदूरबार, वर्धा, उदगीर, हिंगनघाट