शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या हस्ते शौर्यपदके प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:07 IST

पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक’ व ‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकांचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी वितरण झाले.

मुंबई, : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक’ व ‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकांचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी वितरण झाले.पोलीस पदक वितरणाचा ‘अलंकरण समारंभ नरिमन पाँईंट येथील टाटा थिएटर येथे झाला. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव,पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी १३८ पोलीस अधिकारी आणि अंमलदाराना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बृहन्मुंबईचे सहायक पोलीस उप निरीक्षक वसंत राजाराम सारंग, ठाणे शहराचे सहायक पोलीस उप निरीक्षक मोतीलाल दगडू पाटील यांना पोलीस पदक देण्यात आले.पोलीस पदक प्राप्त अधिकारी कर्मचारी : सिडकोचे दक्षता अधिकारी अपर पोलीस महासंचालक विनय महादेवराव कारगांवकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ.छेरिंग दोरजे, बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त संजय वासुदेव जांभुळकर, सशस्त्र पोलीस ताडदेवचे सेवानिवृत्त पोलीस उप आयुक्त श्रीप्रकाश मारुती वाघमारे, मंत्रालय सुरक्षाचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त शांतीलाल अर्जुन भामरे, पालघरचे सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक भगवान गोपाजी यशोद, ठाणे शहराचे पोलीस उपआयुक्त डॉ.संजय हिंदुराव शिंदे, गुन्हे शाखा अंमलबजावणीचे पोलीस उप आयुक्त राजेंद्र गणपत दाभाडे,दक्षताचे मुख्य संपादक सहायक पोलीस उप महानिरीक्षक यशवंत नामदेव व्हटकर,बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपआयुक्त बाळकृष्ण मोतीराम यादव, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त सुरेखा प्रताप दुग्गे, नवी मुंबईचे सहायक आयुक्त नितीन चंपतराव कौसडीकर, नवी मुंबईचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल बाजारे, रायगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावता शिंदे, बृहन्मुंबईचे वरिष्ठ निरीक्षक सर्वश्री बृहन्मुंबईचे निरीक्षक सुभाष दगडखैरे, राज्य राखीव पोलीस दलाच्या मुंबईच्या गट क्रंमाक ८ चे पोलीस निरीक्षक सतीश क्षिरसागर, बृहन्मुंबईचे सहायक निरीक्षक फिरोज पटेल,बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त उप निरीक्षक विष्णू त्रिबंकराव बडे, बृहन्मुंबईचे उप निरीक्षक सर्वश्री सखाराम दत्तु रेडेकर, राजन मांजरेकर, एकनाथ केसरकर, बाळासाहेब श्रीपती देसाई.राष्टÑपती शौर्यपदक : राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक हे राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र मधुकर कुलकर्णी,नियोजन व समन्वयचे अपर पोलीस महासंचालक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण, विक्रीकर विभाग, दक्षता अधिकारी येथील अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल, बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त शशिकांत दत्तात्रय सुर्वे, वांद्रे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय लक्ष्मण कदम.