शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक आहात तर पुरावा द्या !

By admin | Updated: August 10, 2014 18:27 IST

विद्यार्थी, पालक अडचणीत : गरज नसताना शाळा-महाविद्यालयांद्वारा प्रमाणपत्राची मागणी

मेहकर: अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची, काही शाळा-महाविद्यालयांकडून अल्पसंख्यांक प्रमाणपत्राच्या नावाखाली अडवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. राज्य शासनातर्फे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसह विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना, काही शाळा-महाविद्यालयांकडून, ह्यअल्पसंख्यांक आहात तर तसा पुरावा द्या!ह्ण, असे सुनावले जात आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयातर्फे अल्पसंख्यांक असल्याचे प्रमाणपत्र दिल्या जात नसताना, शाळा-महाविद्यालयांकडून अशा प्रमाणपत्राची मागणी होत असल्याने, विद्यार्थी व पालक अडचणीत सापडत आहेत. केंद्र शासनाने मुस्लीम, बौद्ध, शीख, ख्रिश्‍चन, पारसी व जैन या समाजांचा अल्पसंख्यांकामध्ये समावेश केला आहे. अल्पसंख्यांक समाजामधील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेचाही समावेश आहे. या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना, अनेक शाळा, महाविद्यालयांद्वारा, ते अल्पसंख्य समाजाचे असल्याचे सिद्ध करणारा पुरावा मागितला जात आहे; परंतु असे प्रमाणपत्र कुठल्याही शासकीय कार्यालयातर्फे जारी केल्या जात नाही. एखादा अल्पसंख्याक विद्यार्थी धर्माच्या पुराव्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी तहसील अथवा अन्य एखाद्या शासकीय कार्यालयात गेला, तर त्याला अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना वैयक्तीक पातळीवर शासनाकडून अल्पसंख्यांक प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याचा शासन निर्णय दाखविण्यात येतो व परत पाठविले जाते. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख असतानाही काही शाळा-महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांकत्व सिद्ध करण्यास सांगितले जाणे अनाकलनीय आहे.