शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 12:19 IST

मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले.

ठळक मुद्देमुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला.. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झालेले बघायला मिळालं.

मुंबई, दि. 9- मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झालेले बघायला मिळालं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आत्तापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. आरक्षण न देण्याचं कोणतंही  कारण नसताना आरक्षण द्यायला दिरंगाई नको. सरकारने लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकढा पाठिंबा असताना सरकारचं घोडं अडलं कुठे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचं विधीमंडळाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे लक्ष लागलं आहे, मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय़ घ्यावा, असंही अजित पवार म्हणाले आहेत.  पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ बघायला मिळाला. 'चर्चा नको आरक्षण हवं' अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीमुळे दुपारी ३ वाजेपर्यंत विधानभवनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. 

आरक्षणाच्या मागणीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान झालेलं बघायला मिळालं. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या तसंच बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतून मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये अनेक राजकीय नेत्यांचासुद्धा सहभाग आहे. 

विरोधी पक्षाकडून सभागह सुरू असताना सुरूवातीचा प्रश्नोत्तराचा तास बाजूला सारावा, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सगळ्यांचाच पाठिंबा मिळतो आहे. आज मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठाबांधव एकवटे आहेत. मुंबईमध्ये अशी परिस्थिती असताना, सरकार मात्र विरोधकांना भूमिका मांडू देत नाही, या मुद्द्यावरून विरोधकांनी विधीमंडळात गोंधळ घातला. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात विधीमंडळात विरोधकांना भूमिका मांडू द्यायची मागणी विरोधकांनी अध्यक्षांकडे केली पण त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांनी सभागृह सुरू ठेवू दिलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. सकाळी जेव्हा मराठा मोर्चा सुरू होत होता तेव्हा सत्ताधारी पक्षातील आमदार तिथे गेले होते पण मराठाबांधवांनी त्यांना प्रवेश नाकारला. सरकारने असं दुटप्पी राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणाले आहेत. 

फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागीविधानभवनात मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून विधानभवनात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. विधानभवनातून विरोधक आझाद मैदानाकडे रवाना होत त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीही केली. यावेळी सतेज पाटलांनी अजित पवारांना फेटा बांधला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा