शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

सुविधा द्या, मगच गाव सोडण्यास सांगा

By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST

प्रकल्पबाधित स्थलांतरणाच्या विरोधात नाही, उलट त्यांची सहकार्याची भूमिका आहे. मात्र ज्या गावात जायचे आहे तेथे किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, नंतरच स्थलांतरणाचे आदेश काढा,

गोसेखुर्द : संघर्ष समितीची विनंतीनागपूर : प्रकल्पबाधित स्थलांतरणाच्या विरोधात नाही, उलट त्यांची सहकार्याची भूमिका आहे. मात्र ज्या गावात जायचे आहे तेथे किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, नंतरच स्थलांतरणाचे आदेश काढा, असे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने म्हटले आहे.गोसेखुर्द प्रकल्पबाधित गावांपैकी नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर,सिर्सी, खराडा व पांजरेपार या चार गावांना ३० जूनपर्यंत स्थलांतरण करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. स्थलांतरणासाठी फक्त १५ दिवसांचा काळ शिल्लक आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनासाठी धरणातील पाण्याची पातळी वाढविणे महत्त्वाचे आहे. मात्र प्रकल्पबाधितांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाने स्थलांतरणासाठी नोटीस बजावल्या. पण गावकऱ्यांना ज्या गावात जायचे आहे तेथे नागरी सुविधाही नाहीत, याकडे संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी लक्ष वेधले आहे. सिर्सीला स्थलांतरणाची नोटीस बजावण्यात आली आहे. या गावचे सोनपूर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तेथे विहीर खोदण्यात आली. पण त्यात पाणी नाही. पाणीच नसेल तर गावकरी राहतील कसे, असा सवाल त्यांनी केला. पाणी नसल्याने पुनर्वसित गावातील बांधकामेही थांबली आहेत. पुनर्वसित गावात किती सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या याचा सविस्तर आढावा प्रशासनाने घ्यावा तसेच सर्व प्रलंबित प्रश्नांचा निपटारा केल्यावर स्थलांतरणाचे आदेश काढावे, असे भोंगाडे यांनी सांगितले.अनेक पुनर्वसित गावात दहा वर्षापूर्वी कामे करण्यात आली. त्याची अवस्था सध्या दयनीय आहे. या कामाच्या दुरुस्तीची गरज असताना प्रशासन त्याबाबत गंभीर नाही. प्रकल्पबाधितांना त्यांच्या घराच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज मिळाले नाही. यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आले. पण त्यावर निर्णय झाला नाही. याबाबत पाठपुरावाही केला जात नाही, याकडे भोंगाडे यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)