शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा!

By admin | Updated: November 6, 2016 02:24 IST

आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीमागे भाजपा नेत्याचा हात असल्याचा आरोप होत असल्याने अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई : आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीमागे भाजपा नेत्याचा हात असल्याचा आरोप होत असल्याने अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी स्पष्टीकरण देत आपला बचाव केला. आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा, असे आव्हान त्यांनी शिवसेनासह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना दिले आहे. त्यामुळे अधिकारी बदली प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.बोरीवली येथील आर-मध्य विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांची दोन दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र ते कर्तव्यदक्ष अधिकारी असून, स्थानिक आमदारांच्या दबावामुळे पालिका प्रशासनाने ही बदली केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला. ही बदली रद्द करण्यासाठी शनिवारी केलेल्या ठिय्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेबरोबरच शिवसेनेचे नगरसेवकही सामील झाले होते. मात्र या आरोपांचे खंडन करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नाही. गांधी यांच्या बदलीसाठी आपण आयुक्तांवर दबाव आणला नाही. त्यांची बदली का केली? हे आयुक्तांनाच विचारावे, तसेच माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी ते सिद्ध करावे, अन्यथा माझी जाहीर माफी मागावी, असे आव्हान प्रसारमाध्यमांशी बोलताना तावडे यांनी विरोधी पक्षांसह शिवसेनेलाही दिले आहे. (प्रतिनिधी)