शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत

By admin | Updated: March 12, 2016 01:34 IST

जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ताब्यात घेतल्याने ते धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत.

मार्गासनी : जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ताब्यात घेतल्याने ते धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गुंजवणी धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. वेल्हे तालुक्यातील काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी येथील शिवगोरक्ष कार्यालयात झालेल्या सभेस आमदार संग्राम थोपटे, वेल्हे तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष दसवडकर, तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप लोहकरे, नाना राऊत, रामनाना कोकाटे, वेल्हेच्या सभापती सविता वाडघरे, चतुरा नगिणे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, भगवान पासलकर, आकाश वाडघरे, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर आदी कार्यकर्ते व सुमारे ४०० धरणग्रस्त आंदोलनासाठी उपस्थित होते.जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी, ‘धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही’ या दिलेल्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आतापर्यंत वाट पाहिली. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करून आम्ही पाणी जाऊ देणार नाही. जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात एक गुंठाही जमीन संपादित नाही. यावर ते एक शब्दही काढत नाहीत. मात्र पाणी नेण्यासाठी खटाटोप करत आहेत. आज होणाऱ्या आंदोलनासाठी मोठा पोलीस फौजफाटा पाठवून आंदोलन गप्प करण्याचा हा प्रयत्न धरणग्रस्त खपवून घेणार नाहीत़, असा इशारा या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी दिला. या वेळी भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, प्रकल्प अधिकारी आर. बी. पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन धरणाचे काम बंद न करण्याची विनंती केली. येत्या १४ मार्चला बैठक होणार असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलकांनी बैठक घेईपर्र्यंत धरणाचे काम बंद करण्याची मागणी केली. मात्र त्यास नकार मिळाल्यावर थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी धरणाकडे जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी धरणाकडे जाणारा रस्ता बंद करून थोपटे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून जामिनावर सोडण्यात आले.बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर, शाहीद पठाण यांच्यासह मोठा बंदोबस्त व राखीव पोलीस दल या वेळी तैनात करण्यात आले होते. (वार्ताहर)