शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

कायद्याच्या चौकटीत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन !

By admin | Updated: July 22, 2016 01:58 IST

प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात सनदशीर मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला जाणार आहे. यासाठी संघटनात्मक बांधणी केली जाणार असून सोशल मीडिया, विधी, माहिती अधिकार व इतर कामांसाठी स्वतंत्र टीम तयार केल्या जाणार आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी १८ जुलै रोजी पहिल्यांदा नवी मुंबई बंदचे आवाहन केले होते. आक्रमक म्हणून ओळख असणाऱ्या तरूणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. महामार्गानजीक असलेल्या सानपाडा दत्तमंदिरजवळ प्रकल्पग्रस्तांचा मेळावा होणार असल्याने महामार्ग अडविला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली होती. व्यावसायिकांना धमकाविण्याची व रिक्षा, बसवर दगडफेक केली जाईल अशीही शक्यता वर्तविली जात होती. मोर्चाला ठोस अनुभवी नेतृत्व नसल्याने संतप्त जमावाला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आगरी कोळी युथ फाऊंडेशनने आंदोलन हे शांततेमध्ये व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन केल्यामुळे दिवसभरामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. कुठेही तोडफोड, रास्ता रोको झाले नाही. यामुळे चळवळीची धुरा नव्याने खांद्यावर घेतलेल्या तरूणांविषयी पोलिसांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी रात्री कोपरखैरणेमधील शेतकरी समाजमंदिरामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ३०० पेक्षा जास्त तरूण या बैठकीला आले होते. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची यशोगाथा सर्वांना सांगण्यात आली. कूळ कायद्यापासून विमानतळापर्यंतच्या सर्व लढ्यांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन व पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही प्रकारे हिंसक आंदोलने केली जाणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून यापूर्वी अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. यापुढेही विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तरूणांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या जातील. माहिती अधिकाराचा वापर करणे, कायदेविषयक मार्गदर्शन, गावपातळीवर समन्वय टीम, सेंट्रल युनिट अशाप्रकारे रचना करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. यावेळी संजय पाटील व मंगेश म्हात्रे यांनी बैठकीचा उद्देश पटवून दिला. नीलेश पाटील व राहुल ठाकूर यांनी उपस्थितांना चळवळ व नियोजनातील बदलांविषयी मार्गदर्शन केले. >प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचा इतिहास तरूणांच्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यावर प्रकाश टाकण्यात आला. पहिले आमदार व शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी १९३२ ते १९३९ दरम्यान कूळ कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा संप घडवून आणला. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा हा जगातील एकमेव संप आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको व शासनाविरोधात लढा. यामुळे साडेबारा टक्के योजना देणे शासनास भाग पडले. विमानतळ, सेस, जेएनपीटी विरोधात लढलेल्या लढ्यांविषयी माहिती यावेळी देण्यात आली.