शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सागरी शिवस्मारकापेक्षा गड टिकवा

By admin | Updated: February 22, 2016 02:14 IST

राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची

पुणे : राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची स्मारके आहेत, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले़‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटेनिअरिंग’च्या वतीने ज्येष्ठ गिर्यारोहक एऩ के. महाजन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रविवारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ पुतळे बांधणे ही लोकांच्या आवडीची गोष्ट आहे़ अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीपेक्षा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये उभारण्याची काय गरज आहे, असा सवाल राज यांनी केला. डोंगर पोखरले जात आहेत़ प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे़ गडकिल्ले कायम तसेच राहतील यासाठी काय करता येईल ते पाहावे़, असे ते म्हणाले.बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘शिवाजी’ या तीन अक्षरांसाठी संपूर्ण हयात खर्च केली़ शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवला, पण त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचे वाटेल तसेच राजकारण केले़ शिवाजी महाराज गेले नसतील, त्यापेक्षा अधिक वेळा एऩ के. महाजन हे सिंहगडावर गेले आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले़शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा़ मतभेद असतील तर ते व्यक्त करावेत़ प्रखर टीका करावी़ पण गडकिल्ले आणि शिवाजी महाराजांची चेष्टा करू नये, असे पुरंदरे यांनी सांगितले़ गडकिल्ल्यांवर गेल्याने स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते़ मी तरुणांना किल्ल्यांवर घेऊन जातो़ हे तरुण माझी स्फूर्ती आहेत.गडकिल्ले चढण्यात जो आनंद आहे़ तो बाजारात विकत मिळणार नाही, असे महाजन यांनी सांगितले़ पुरंदरे आणि महाजन यांच्या कार्यामध्ये साथ देणारे त्यांचे सहकारी प्रतापराव टिपरे, शैलेश वरखडे, ज्ञानेश्वर जाधव, मकरंद कोलटकर, शरदचंद्र टिळे यांचाही सन्मान करण्यात आला़ (प्रतिनिधी)