शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

By admin | Updated: August 10, 2015 00:07 IST

पन्हाळ्याजवळ कारवाई : आठजणांना अटक; कर्नाटकातील मंत्र्याच्या स्वीय सहायकाचा समावेश

कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याला आणि दरी-डोंगरांच्या जंगलात इंजोळेपैकी खडेखोळवाडी येथील आलिशान फार्महाऊसवर ‘पर्यटन केंद्रा’च्या नावाखाली हायफाय वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या अड्डामालक बाबासाहेब कोंडे, चालक टीना पंडित यांच्यासह आठजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.अटक आरोपींपैकी संशयित किरणसिंग राजपूत हा कर्नाटकातील वजनदार मंत्र्यांचा स्वीय सहायक, तर अन्य तिघेजण कर्नाटकातील मंत्रालयात उच्चपदावर अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चार वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित बाबासाहेब दिनकर कोंडे (वय ४२, रा. इंजोळे, ता. पन्हाळा), टीना ऊर्फ नर्मिता दैनंदिन पंडित (४०, कोल्हापूर, मूळ बालेश्वर, ओरिसा), किरणसिंग बाळाराम राजपूत (३०, रा. यमकनमर्डी, जि. बेळगाव), आप्पासाहेब रामगोंडा पाटील (४०, रा. संकेश्वर-अंकली, जि. बेळगाव), मंजुनाथ प्रकाश कलगुटकी (३३, रा. गावठाण, जि. बेळगाव), नागराज हणमंतया (३९, रा. बंगलोर), हेमंत गोरूर रामाईगौंडा (३५), शिवनगौंडा यलाप्पागौडा पाटील (३७), अरुण मल्लाप्पा मुस्लिमारी (३४, रा. बंगलोर) अशी त्यांची नावे आहेत. सर्वांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली. पीडित पाच तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. नागराज हणमंतया, हेमंत रामाईगोंडा व अरुण मुस्लिमारी हे कर्नाटकातील मंत्रालयात उच्चपदावर अधिकारी आहेत तसेच मंजुनाथ कलगुटकी व्यापारी आहे. आप्पासाहेब पाटील, शिवनगौंडा पाटील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून विदेशी मद्य, रोख रक्कम, साऊंड सिस्टीम, मोबाईल हँडसेट यासह तीन चारचाकी वाहने जप्त केली. खडेखोळवाडी येथे बाबासाहेब कोंडे याचे कृषी पर्यटन केंद्र आहे. याठिकाणी त्याने फार्महाऊस बांधले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याने येथे टीनाच्या मदतीने सांस्कृतिक नृत्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू केला होता. त्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री फार्महाऊसवर छापा टाकून पीडित तरुणींसह आठजणांना अटक केली. दरम्यान, अंधारात १० ते १५ लोक बॅटरीच्या प्रकाशात फार्महाऊसच्या दिशेने येत असल्याचे अड्डामालक कोंडे याला दिसताच त्याने सुरक्षारक्षकासह तेथून पळ काढला. तो थेट इंजोळे येथील घरी येऊन लपला होता. त्याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईची माहिती समजताच निपाणीतील काही कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक मोहिते यांना कारवाई करू नका, किरणसिंग राजपूत हा कर्नाटकातील एका मंत्र्यांचा खासगी सहायक असल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत कारवाई करून आरोपींना पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी) जिल्ह्यात चार ठिकाणी अड्डे फार्महाऊसच्या नावाखाली जिल्ह्यात चार ठिकाणी वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. अन्य तीन ठिकाणीही अशा पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अड्डाचालक टीना पंडित ही चार फार्महाऊसवर नेटवर्क चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.