शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च लढणाऱ्याला कैद

By admin | Updated: January 16, 2015 00:57 IST

वकील नसताना वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च चालविणाऱ्या एका आरोपीला बनावट दस्तऐवजावर दुसऱ्याला विकलेली वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याच्या प्रकरणात गुरुवारी मुख्य

न्यायालय : प्रकरण बनावट दस्तावेजावर मालमत्ता हडपण्याचेनागपूर : वकील नसताना वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च चालविणाऱ्या एका आरोपीला बनावट दस्तऐवजावर दुसऱ्याला विकलेली वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याच्या प्रकरणात गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.विवेक रामदास मोकदम (५४), असे या आरोपीचे नाव असून तो गांधीनगर येथील रहिवासी आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, विवेकचे वडील रामदास मोकदम यांनी १२ आॅगस्ट १९९४ रोजी आपला गांधीनगर येथील ४२९.१२ चौरस मीटरचा भूखंड रवी शर्मा नावाच्या एका बिल्डरला पाच लाख रुपयात विकला होता. विवेकने या मालमत्तेत आपला हिस्सा असल्याचा दावा करून आपल्या वडिलांविरुद्ध न्यायालयात खटला भरला होता. त्यावेळी खुद्द वडिलांनी विवेकसोबत समझोता करून त्याला २ लाख रुपये दिले होते. समझोत्याच्या वेळी विवेकने आपण या मालमत्तेतून आपला हक्क सोडत असल्याचे लिहून दिले होते. रामदास मोकदम यांनी रवी शर्मा यांच्याकडून भूखंडाचे पूर्ण पैसे घेतले होते. केवळ विक्रीपत्र करणे बाकी होते. दुर्दैवाने २७ फेब्रुवारी २००० रोजी रामदास मोकदम यांचा मृत्यू झाला होता. रवी शर्मा यांना या ठिकाणी फ्लॅट स्किम उभी करायची होती. इच्छूक फ्लॅटधारकांनी त्यात पैसा गुंतवला होता. परंतु विलंबामुळे शर्मा यांना लोकांनी पैसे परत मागितले होते. त्यामुळे शर्मा यांनी हा भूखंड ९ लाख रुपयात सुकुमार इंदनलाल नशिने यांना विकला होता. मृत्यूपूर्वी ही मंजुरी खुद्द रामदास मोकदम यांनी दिली होती. दरम्यान विवेकला या भूखंडाचे विक्रीपत्र झाले नाही याबाबतची माहिती होती. गैरफायदा घेऊन त्याने आई कमला आणि बहीण विभा यांना अंधारात ठेवून हक्क सोडण्याबाबतचे त्यांचे बनावट लेख तयार केले होते. ते नासुप्र आणि मनपा कार्यालयातही दाखल केले होते. त्यानंतर त्याने रजिस्ट्री करून हा भूखंड सहा वेळा सहकारी बँकांमध्ये गहाण ठेवून लाखोचे कर्ज उचलले होते. आपली फसवेगिरी झाल्याचे लक्षात येताच नशिने यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून विवेक मोकदमविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिगणेश वांदिले आणि त्यानंतर प्रभाकर धोटे यांनी केला होता. आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात खटला चालून ७ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला या तिन्ही गुन्ह्यात प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी १ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील विजयालक्ष्मी अडगोकर यांनी काम पाहिले. आरोपीने स्वत:चा खटला स्वत:च लढला. (प्रतिनिधी)शिक्षेच्या वेळीही वकिली वेशातचविवेक मोकदमला शिक्षा झाली तेव्हा तो न्यायालयात वकिलाच्या वेशातच होता. वकिलाला शिक्षा झाल्याची वार्ता संपूर्ण जिल्हा न्यायालयात पसरली. डीबीए च्या निवडणुकीचे दिवस असल्याने ही वार्ता ऐकून वकील मंडळी आपला प्रचार अर्धवट सोडून त्यांनी मोकदमकडे धाव घेतली. त्यानंतर तो वकील नसल्याचे समजले. तो वकील नाही, परंतु तो स्वत:चे सर्वच प्रकारचे खटले स्वत: लढतो, असे सरकारी वकिलाकडून सांगण्यात आले.