शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जो न्याय गडकरींना तो शहांनाही लागू, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:47 IST

भारतीय जनता पार्टीच्या लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरी या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांचे राजीनामे घेतले गेले.

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरी या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांचे राजीनामे घेतले गेले. त्याच न्यायाने अमित शहा यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मुलावर झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊ द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.भाजपाचे राष्ट्रीय  अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या टेंपल कंपनीच्या उलाढालीत अचानक १६००० पटीने वाढ झाली आहे. ही कंपनी नोटाबंदीच्या काही दिवस आधी बंद करण्यात आली होती.हे प्रकरण ‘वायर’ या न्यूज पोर्टलने उघडकीस आणले आहे. त्यामुळे या प्रकरणाची आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. याच ‘वायर’ने आधी रॉबर्ट वड्रा यांच्याविषयीची बातमी समोर आणली होती. त्याची याच सरकारने सीबीआयमार्फत चौकशी लावली आहे. तोच पारदर्शीपणा याही प्रकरणात दाखवावा, असेही चव्हाणम्हणाले.जय शहा यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहारांचा खुलासा त्यांनी स्वत: केला पाहिजे. पण एका खाजगी व्यक्तीच्या कारभाराचा खुलासा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल कसे काय करू शकतात? त्यांनी तो खुलासा कोणत्या अधिकारात केला, असा सवालही चव्हाण यांनी केला. जय शहा यांच्या कंपनीला विंड मील व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीने त्यांना कोणत्या अधिकारात १० कोटींचे कर्ज दिले? दुसºया एका खाजगी कंपनीची उलाढाल आठ कोटींच्या आसपास असताना त्या कंपनीने १५ कोटींचे कर्ज कोणत्या नियमानुसार दिले, असे अनेक प्रश्न चौकशीशिवाय सुटणार नाहीत, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAmit Shahअमित शाह