शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 15:39 IST

मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले

मुंबई - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अलीकडच्या काळात सातत्याने वादात राहिलेत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांनी भाजपाचीही कोंडी झाली. त्यानंतर कोश्यारींना हटवण्याची मागणी जोर धरू लागली. 

राज्यपालपदावरून भगतसिंह कोश्यारी पायउतार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. 

वादग्रस्त विधानांमुळे कोश्यारी चर्चेतमहात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, गुजरातींनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्यातील आदर्श अशा विविध वक्तव्यांनी भगतसिंह कोश्यारी अडचणीत आले होते. विरोधकांसह अनेक संघटनांनी कोश्यारींच्या विधानाचा निषेध करत आंदोलन केले होते. कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवावं अशी मागणी होत होती. त्यानंतर नुकतेच भगतसिंह कोश्यारी यांच्या जागेवर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि नंतर आलेले महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात घेतलेल्या विविध राजकीय भूमिका, रखडवून ठेवलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती यामुळे भगतसिंह कोश्यारींवर टीका झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान, तसेच महात्मा फुलेंबाबत काढलेल्या उदगारांमुळे कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीState Governmentराज्य सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी