शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

मुंबईत मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव

By admin | Updated: June 21, 2016 03:47 IST

एकीकडे मित्रपक्ष भाजपाने कोंडी केली असताना आता पालिका प्रशासनानेही शिवसेनेला अडचणीत आणले आहे़ महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मालमत्ता कर

मुंबई : एकीकडे मित्रपक्ष भाजपाने कोंडी केली असताना आता पालिका प्रशासनानेही शिवसेनेला अडचणीत आणले आहे़ महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायी समितीच्या पटलावर आला आहे़ त्यानुसार आता जागेच्या कार्पेटऐवजी बिल्ट एरियानुसार मालमत्ता कराची आकारणी होणार आहे़ यातील नव्या सुत्रानुसार मालमत्तेचा बाजारभाव आणि रेडीरेकनरनुसार या कराची आकारणी होईल़ ऐन निवडणुकीतील ही करवाढ तोंडाला फेस आणणारी असल्याने शिवसेनेकडून यास विरोध सुरु झाला आहे़हा प्रस्ताव यापूर्वी ही स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता़ यामध्ये इमारतीच्या बांधीव क्षेत्राची गणना करण्याकरिता घेण्यात आलेला १़२० हा भारांक करता स्टॅम्प ड्युटी रेडीरेकनरला लागू करण्याचे नवीन सूत्र पालिकेने तयार केले आहे़ मात्र हा भारांक स्टॅम्प ड्युटी रेडीरेकनरला लागू करण्याऐवजी चटईक्षेत्राला लागू करण्याची मागणी करीत हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी फेटाळला होता़जुन्या सुत्रानुसार मालमत्ता करात १२ टक्के घट होणार होती़ त्यावरचा १़२० हा भारांक काढल्यास त्यात आणखी दहा टक्के म्हणजे पालिकेच्या उत्पन्नात एकूण २२ टक्के घट होत होती़ त्यामुळे पालिका प्रशासनाने ज्येष्ठ वकील आणि विधी सल्लागारांचा सल्ला घेतला़ त्यांनी मात्र १़२० हा भारांक स्टॅम्प ड्युटी रेडीरेकनरवर लावण्याचा सल्ला दिला आहे़ त्यामुळे प्रशासनाने नव्या सुत्रांनुसार मालमत्ता कर आकारणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे पुन्हा आणला आहे़ (प्रतिनिधी)बिल्टनुसार आकारणी?मालमत्ता कराच्या नव्या सुत्रामुळे बिल्ट अप एरियानुसार कर आकारणी होणार आहे़ त्यामुळे मालमत्ताच्या बाजारभावानुसार आणि रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारण्यात येणार आहे़ त्यामुळे उपनगरातील मालमत्तांचे दर कमी असल्याने उपनगरात कर कमी व शहरात जादा दर असलेल्या मालमत्तांचा कर अधिक अशी आकारणी होईल, असे समजते़