शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्रामपंचायती बरखास्त करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: August 6, 2016 03:30 IST

ग्रामसभेचा ठराव देण्यास नकार देऊन नंतर वाळू माफीयांच्या संगनमताने या साठ्यातील वाळूची चोरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

पुणे : वाळू साठ्याचे लिलाव करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव देण्यास नकार देऊन नंतर वाळू माफीयांच्या संगनमताने या साठ्यातील वाळूची चोरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत वाळू चोरीचे किती ट्रक पडकले याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर अशा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत.वाळूचे अनेक मोठे साठे उपलब्ध असताना व पर्यावरण विभागाने लिलाव करण्यास मान्यता देखील दिली असताना केवळ ग्रामपंचायतींच्या प्रामुख्याने सरपंच व सदस्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वाळू लिलाव करण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामसभेची मान्यता दिली जात नाही. पुणे जिल्ह्यात तहसीलदारांमार्फत १९४ वाळू भूखंड लिलावासाठी उपलब्ध असल्याचा अहवाल दिला आहे. यामध्ये केवळ ४५ वाळू भूखंडांना ग्रामपंचायतींनी शिफारस दिली आहे. तर यातील २५ वाळू भूखंडाचे लिलाव करण्यास हरकत नसल्याचे पर्यावरण विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने दौंड, इंदापूर, आंबेगाव, शिरुर आणि बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू भूखंड उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)>ग्रामपंचायती घेतायत नियमाचा गैरफायदाराज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून वाळू लिलाव करण्यासाठी ग्रामपंचायतींची शिफारस घेणे बंधनकारक केले आहे. पंरतु या नियमाचा आता ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांकडून गैरवापर सुरु झाला असून, वाळू लिलाव करण्यासाठी नकार देऊन नंतर वाळू माफियांच्या संगनमताने वाळू चोरी करायची पद्धत सुरु झाली आहे. यामुळे दर वर्षी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यामध्ये दौंड आणि इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. >ठराव न दिलेल्या ग्रामपंचायती दौंड- पारगाव, देऊळगाव राजे, मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खानवटे, इंदापूर- डाळज क्र. २, चांडगाव, शिरसोडी, कालठण, पडस्थळ, कळाचे गाव.