शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
2
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
3
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
6
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
7
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
8
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
9
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
10
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
11
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
12
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
13
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
14
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
15
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
16
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
17
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
19
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
20
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी

नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टची मालमत्ता होणार सरकारजमा; पडताळणीचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:59 IST

नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संबंधीत धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे.

गौरीशंकर घाळे -मुंबई : महाराष्ट्रातील नोंदणी रद्द झालेल्या विश्वस्त संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सरकारजमा होणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या मालमत्तांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे धर्मादाय आयुक्तांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ट्रस्ट, संस्थांची नोंदणी होत असते. यातील अनेक संस्था नियमानुसार ऑडिट रिपोर्ट आणि चेंज रिपोर्ट सादर करत नाहीत. तर, अनेक संस्था या वर्षानुवर्षे निष्क्रिय असतात, त्यांच्या मार्फत कोणतेच कामकाज होत नाही. मात्र, त्या नोंदणीकृत असल्याने धर्मादाय आयुक्तालयावर निष्क्रिय संस्थांचा बोजा मात्र वाढत असतो. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानंतर राज्यभरात अशा संस्थांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तेव्हाच्या एकूण ८ लाख १७ हजार ४१६ नोंदणीकृत संस्थांपैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ५१६ संस्थांची नोंदणी रद्द केली गेली.नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संबंधीत धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, अद्याप तशी कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टच्या मालमत्तांची पडताळणी करून योग्य कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- नोंदणी रद्द झाल्यानंतर अनेक ठिकाणी संबंधीत ट्रस्टची मालमत्ता सरकारजमा न होता ती बळकावली जाते. विश्वस्त संस्थांची मालमत्ता खासगी बनवून त्याचा वापर केला जातो. - या प्रकाराला आळा घालण्यासाठी मालमत्तांची पडताळणी आणि ती सरकारजमा करण्याची मोहीम धर्मादाय आयुक्तालयाकडून घेतली जाणार आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारState Governmentराज्य सरकार