शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून पदोन्नती रोखणार नाही - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:20 IST

मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पदोन्नत्या रोखल्या जाणार नाहीत. आरक्षणाचा निकष बाजूला ठेवून या कर्मचा-यांना इतर निकषावर पदोन्नती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पदोन्नत्या रोखल्या जाणार नाहीत. आरक्षणाचा निकष बाजूला ठेवून या कर्मचा-यांना इतर निकषावर पदोन्नती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.राज्यात जातपडताळणी प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला पाटील उत्तर देत होते. राज्यातील ३६ जिल्हांत असलेल्या जातपडताळणी समित्यांवरची रिक्त पदे येत्या दोन महिन्यांत भरण्यात येतील, असे आश्वासन सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. राज्यात सध्या ४६ हजार ६६९ जातपडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी सेवापूर्व निकषातील ११ हजार २९ प्रकरणे प्रलंबित आहेत. ही ११ हजार प्रकरणे येत्या दोन महिन्यांत निकाली लागतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील