शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल मार्चपर्यंत; हवाईसह अन्य सर्व सर्वेक्षणाचे काम आटोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 06:53 IST

या सर्वेक्षणातून प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे.

- आनंद शर्मानागपूर : नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्प साकार होण्याच्या दिशेने वेगाने पावले पडताना दिसत आहेत. त्याअनुषंगाने हवाईसह सर्व आवश्यक सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. आता या सर्वेक्षणातून प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे.मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे हा डीपीआर सोपवला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी घ्यावी लागणार आहे. मंजुरी प्राप्त होताच अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडोरच्या धर्तीवर नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्प हा २०१९ मध्ये प्रस्तावित सहा नव्या बुलेट कॉरिडोरपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडकडून डीपीआर बनविण्याच्या दृष्टीने रेल लाइनची अंतिम अलॉटमेंट डिझाइन व प्रायमरी रूट मॅप बनविण्यासाठी आकाशी सर्वेक्षण (लिडार/एरिअल सर्व्हे) करण्यात आले. यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये निविदा जारी करण्यात येऊन सिकॉन व हेलिका ज्वाॅइंट व्हेंचर कंपनीला एरिअल सर्व्हेचे काम देण्यात आले. १२ मार्च २०२१ला सुरू झालेले हे काम जुलै २०२१ मध्ये पूर्ण झाले. यात हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक लीड व इमेजनरी सेंसर लावण्यात येऊन मुुंबई ते नागपूरपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. हवाई सर्वेक्षणानंतर रायडरशिप सर्व्हे, एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट व सोशल इम्पॅक्ट सर्व्हे करण्यात आले. त्यावरून डीपीआर तयार केला जाईल.नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे काम आटोपले आहे. आता या सर्वेक्षणातून प्राप्त अहवालाचे विश्लेषण केले जाऊन डीपीआर तयार केला जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे डीपीआर सोपवला जाण्याची शक्यता आहे. - सुषमा गौर, जनसंपर्क अधिकारी, नॅशनल हायस्पीड रेल कार्पो. लि. वेग ३५० किमी प्रति तासनागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प ७४१ किलोमीटर क्षेत्रावर प्रस्तावित आहे.या क्षेत्रात नागपूर, खापरी डेपो, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, ईगतपुरी व शाहपूर ही प्रस्तावित थांबे असणार आहेत.या कॉरिडॉरमध्ये ३५० किमी प्रति तास वेगाने बुलेट ट्रेन धावेल. ट्रेनमध्ये एकावेळी ७५० प्रवासी बसू शकतील.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन