शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत ‘लोकसत्ता’चा निषेध

By admin | Updated: December 19, 2014 04:54 IST

अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांना जाहीर झालेल्या पॅकेजसंदर्भात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाची भाषा ही निषेधार्हच

नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांना जाहीर झालेल्या पॅकेजसंदर्भात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाची भाषा ही निषेधार्हच आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत व्यक्त केले. शिवाय वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. जोपर्यंत दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्ही घाला घालीत नाहीत, तोपर्यंत तुमचे स्वातंत्र्य मर्यादित आहे. भारतीय राज्यघटनेमध्येच ही स्वातंत्र्याची मर्यादा घालून दिलेली आहे याची जाणीवही त्यांनी यावेळी करुन दिली.त्या अग्रलेखावरून गुरुवारी विधानसभेत चांगलेच वादळ उठले. या अग्रलेखाद्वारे शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला असून त्यांचा निषेध नोंदविण्यात यावा, अशी भावना संतप्त सदस्यांनी व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे. त्या पोशिंद्याची टिंगळटवाळी करणारा लेख ‘बळीराजाची बोगस बोंब’ या शीर्षकांतर्गत छापण्यात आला. हा अतिशय संतापजनक प्रकार असून सभागृहाने त्याचा निषेध करावा, अशी मागणी केली. आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहोत. शेतकऱ्यांच्या नावाने आम्ही निवडून जातो, ही बाबही खरी आहे, परंतु त्याचा अशाप्रकारे अपमान करणे हे संतापजनक आहे. शिवसेनेचे विजय औटी यांनी संपादकाकडून शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून निषेधाचा ठराव मांडला. यावेळी काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला. छगन भुजबळ म्हणाले, सर्व शेतकरी हे ‘कुबेर’ आहे, हे म्हणणे योग्य नाही. एखाद शेतकरी श्रीमंत असू शकतो, परंतु सरसकट सर्वांनाच श्रीमंत म्हणणे योग्य नाही. अग्रलेखामध्ये जी भाषा वापरली ती अतिशय वाईट आहे. कलावंतांबाबतही यात अपशब्द वापरले आहेत. भाजपाचे आशिष शेलार म्हणाले, मी निषेध करणारा लेख पाठविला होता. तो छापून आला, परंतु त्याचा आशयच बदलण्यात आला आहे.बाळासाहेब थोरात म्हणाले, दागिने हे महिलांचे स्त्रीधन म्हणून ओळखले जाते. प्रतिकूल परिस्थितीत ते दागिने गहाण ठेवून आपले काम भागविण्याची शेतकऱ्यांमध्ये एक पद्धत आहे. परंतु अग्रलेखामध्ये शेतकऱ्यांच्या पत्नींच्या दागिन्यांचा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्याचे काम करण्यात आल्याने त्याचा निषेध झालाच पाहिजे, अशी मागणी केली. सर्व पक्षीय सदस्यांचा संतप्त भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी हा आत्महत्या करतो, त्यासाठी तशी परिस्थिती कारणीभूत ठरते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असेल, चारही बाजूंनी तो त्रस्त झाला असेल तरच तो आत्महत्या करीत असतो. अशाप्रसंगी त्या शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देण्याची भावना ठेवणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सुद्धा हीच भावना ठेवण्याची गरज आहे. प्रसिद्धी माध्यमांनी राजकीय नेत्यांवर टीका केली तरी चालेल. तो त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार अबाधित आहे. यासंबंधात निषेध ठराव आदी गोष्टी या वेगळ्या आहेत. परंतु अग्रलेखाची भाषा हीन आहे. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याला कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. परंतु या भाषेचा मात्र निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.